Western maharashtra Saam tv news
महाराष्ट्र

सांगली, सातारा, कोल्हापूर; काळेकुट्ट ढगांची वाटचाल पश्चिम महाराष्ट्राकडे, कुठे कशी परिस्थिती?

Flood Alert in Western Maharashtra: पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली. सांगली, कोल्हापूर, पंढरपूर आणि चंद्रभागा नदीकाठच्या भागात पाणी शिरलं. आतापर्यंत 700 पेक्षा जास्त कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर.

Bhagyashree Kamble

  • पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली.

  • सांगली, कोल्हापूर, पंढरपूर आणि चंद्रभागा नदीकाठच्या भागात पाणी शिरलं.

  • आतापर्यंत 700 पेक्षा जास्त कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर.

  • प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करत नागरिकांना इशारा दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे अनेक भाग तुंबले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली होती, मात्र आता शहर पुन्हा पूर्वपदावर आलं आहे. मात्र ढगांची वाटचाल आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळल्याने कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

कोल्हापूर

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे कोल्हापूरची पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. पंचगंगेची पाणीपातळी 42 फूट 7 इंचावर पोहोचली आहे. 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत. कोल्हापूर - पन्हाळा आणि कोल्हापूर शिये मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद झाले आहे. सुतार वाडा येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. राधानगरी धरणाचे २ स्वयंचलित दरवाजे उघडले. राधानगरीतून एकूण 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपत्रात सुरू. पुराचे पाणी आल्यानं कोकणाकडे जाणारे मार्ग अद्याप बंद.

सांगली

सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सांगली शहरातील सकल भागांमध्ये पाणी शिरलं आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, कुरणे वस्ती या ठिकाणी पाणी शिरल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 150 च्या जवळपास कुटुंब स्थलांतरित झाले आहेत. आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे

पंढरपूर

पंढरपुरात भीमा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. व्यास नारायण आणि अंबिका नगर झोपडपट्टी पावसाचे पाणी शिरले आहे. पुरामुळे १२५ कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. पुढील काही तासांत आणखी ५० कुटुंब स्थलांतरित होणार आहेत. भीमेच्या पाण्याचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागला. पुढील काही तासांत अजून पाणी वाढण्याची शक्यता.

चंद्रभागा नदी

पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. शहराला सध्या पूराचा धोका आहे. नदीकाठच्या भागात पाणी शिरल्याने 400 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गोपाळपूर पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली तब्बल २ तास कुंभाची आढावा बैठक

लग्नात नाचताना अचानक कोसळली, स्टेजवरच महिलेचा मृत्यू; घटनेचा Video Viral

Raigad Boat Mishap Drown: रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाली, बचावकार्याचा थरारक व्हिडिओ समोर, पाहा...

Akshaya Deodhar: रूपसुंदरा 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Ganesh Festival : गणेश विसर्जनानिमित्त वाहतुकीत बदल; माणकोली पुलावर वाहतुकीला बंदी; विसर्जनाचे चार दिवस असणार पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT