Ratnagiri Five Corporators Will Join Shiv Sena  SaamTV
महाराष्ट्र

Ratnagiri News : रत्नागिरीत ठाकरे गटाला खिंडार, पाच नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

Ratnagiri Five Corporators Will Join Shiv Sena : विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Prashant Patil

रत्नागिरी : रत्नागिरीतील नगर पंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडली आहे. पंचायतीमधील पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या पाचही नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला होता. आता विकासकामांसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करुन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज जिल्हा प्रशासनाला पत्र दिलं असून कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली आहे. तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हे पाच नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, कोकणात उद्धव ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. टायगर ऑपरेशनने ठाकरे गटाला मोठे धक्के बसले आहेत. रत्नागिरी येथील एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्या दिवशीच ठाकरे गटाचे रत्नागिरीचे विद्यमान जिल्हाप्रमुखांना तातडीने बदलण्याची नामुष्की ठाकरे गटावर आली. अशातच आता उद्धव ठाकरे यांचे आणखी एक महाराष्ट्रातील बडे शिलेदार असलेले मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनीही आपली खदखद व्यक्त केल्याने भास्कर जाधव यांच्या मनात नेमकं चाललय काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यादरम्यान उदय सामंत यांनीही आता माजी आमदार प्रवेश केल्यानंतर आता आजी आमदारच राहतात, असंही सूचक वक्तव्य केल्याने भास्कर जाधव यांच्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT