विविध महापालिकांतर्फे सांगलीतील पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहिम विजय पाटील
महाराष्ट्र

Great! पाच महानगरपालिकांतर्फे सांगलीतील पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहिम

सांगली महापालिकेच्या मदतीला बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी, सोलापूर या चार महापालिकेच्या टीम आल्या असून 50 हुन अधिक वाहने आणि 150 कर्मचारी सांगलीच्या स्वच्छतेसाठी उतरले आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगलीत महापूर ओसरल्यानंतर पूर पट्ट्यात स्वच्छतेला सांगली महापालिकेने गती दिली आहे. सांगली महापालिकेच्या (SMKC) मदतीला बृहन्मुंबई (BMC), पुणे (PMC), पिंपरी (PCMC), सोलापूर (SMC) या चार महापालिकेच्या टीमसुद्धा आल्या असून 50 हुन अधिक वाहने आणि 150 कर्मचारी सांगलीच्या स्वच्छतेसाठी उतरले आहेत. (five municipal corporations are cleaning flood affected area in sangli)

हे देखील पहा -

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटावर गेल्यानंतर निम्मे शहर जलमय झाले होते. सोमवारपासून पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाल्यानंतर महापालिकेकडून स्वच्छता औषध आणि धूर फवारणी हाती घेण्यात आली आहे. याचबरोबर पाणी ओसरल्यावर निर्माण झालेला राडारोडा उचलून रस्ते स्वच्छ करण्याचे कामही गतीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी सांगली महापालिकेचे आरोग्य कर्मचारी स्वच्छता करत आहेतच शिवाय पुणे, मुंबई, सोलापूर, पिंपरी या महापालिकांच्या टीम स्वच्छतेसाठी दाखल होत स्वच्छता सुरू केली आहे.

सांगली शहर, सांगली वाडी, मिरजेच्या कृष्णा घाट परिसरात सुद्धा स्वच्छतेसाठी अन्य महापालिकांचे कर्मचारी काम करत आहेत. यासाठी 150 कर्मचारी आणि 50 हुन अधिक वाहने स्वच्छता कामात आहेत. यासह अन्य महापालिकांची टीमही सांगलीत येत असून सांगली शहरातील रस्ते चिखलमुक्त आणि कचरामुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT