Mango tree gifts in marriage ceremony at sangli
Mango tree gifts in marriage ceremony at sangli saam tv
महाराष्ट्र

हे तर भारीच! विवाह सोहळ्यात पाचशे झाडांचे वाटप; वधू-वराला आंब्याच्या रोपट्यांचा आहेर

विजय पाटील

सांगली : लग्नसोहळा म्हटलं की, वारेमाप खर्च करून पाहुण्यांचे डोळे दीपवण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, पर्यावरण रक्षणाचे भान ठेवत सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत आनंदा पाटील (vishnupant patil) यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला. पुतण्याच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी पाचशे झाडे लावण्याचा संकल्प करीत लग्नात पाहुण्यांना फुलझाडाच्या आंब्याच्या रोपट्यांचा (Mango tree gifts) आहेर केला. त्यांनी कलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या (Environment) सामाजिक कार्याबाबत सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पाटील कुटुंबातील नारायण व मोहिते कुटुंबातील ऐश्वर्या यांचा विवाह आदर्श ठरला. लग्नात अनावश्यक खर्च टाळून वृक्ष लागवड व संगोपन करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबियांनी घेतला. फेटे, फटाके, डिजे, सजावट, उपरणे-टोप्या आणि इतर खर्चाला पूर्ण फाटा देण्यात आला. हा खर्च समाजोपयोगी उपक्रमासाठी खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले. लग्नात पाहुण्यांनाही फुलझाडांच्या रोपांचा आहेर करण्यात आला. या माध्यमातून पाचशे रोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यामुळे हा आगळावेगळा विवाह चर्चेचा विषय ठरला.

नारायण पाटील यांनी वृक्षारोपण लागवडीसाठी जनजागृती केली आहे. रोपांचे वाटप करून नवपिढीला पर्यावरण रक्षणाचा चांगला संदेश दिला आहे. पर्यावरणात होत असलेले बदल याचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे आणि हे प्रत्येक युवकाच कर्तव्य आहे, असं विष्णुपंत आनंदा पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited by - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; काय आहेत प्रमुख कारणे?

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT