संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेचं शिवधनुष्य चालत नाही, हे आमचं दुर्देवं - विनायक राऊत

राणे कुटुंबीयांनी भाजपची लाचारी सुरू केली आहे - विनायक राऊत
Vinayak Raut
Vinayak Raut Saam Tv
Published On

कल्याण : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी चालली. भाजपच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीला ते हजेरी लावायचे. मात्र शिवसेनेचं शिवधनुष्य त्यांना चाललं नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी कल्याणमध्ये दिली आहे. तर खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची काय लायकी आहे ? त्याची समाजामध्ये, स्वतःचा पक्ष बुडीत काढला, राणे कुटुंबीयांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी भाजपची लाचारी सुरू केली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांची बकवासगिरी आम्ही आता मोडीत काढली आहे, अशा शब्दात राऊत यांनी राणे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. राऊत कल्याण मध्ये शिवसंपर्क अभियानासाठी आयोजित मेळाव्यात नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

Vinayak Raut
मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणारी ही कोण जोडी आहे ? काँग्रेसचा राणा दाम्पत्याला टोला

शिवसंपर्क अभियानासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कल्याण पश्चिमेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी शाहू महाराज यांनी जे वक्तव्य केले त्याबाबत प्रतिक्रिया दिली. संभाजी राजे यांनी केलेल्या शिवसेनेवरील आरोपानंतर त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा अपमान छत्रपती घराण्याचा अपमान कसा,असा सवाल करत संभाजी राजे यांना खडेबोल सुनावले .तर याबाबत छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत सत्य तेच बोललो ,वडिलांचा मी आदर करतो.ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही,अस ट्विट केलं.याबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानतो.त्यांना वंदन करतो,असे सांगताना अशा पद्धतीने मोठ्या विचारांचे शाहू महाराज आजही या महाराष्ट्रात आहेत.आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभतय हे आमचं भाग्य असल्याचे सांगितले.

शाहू महाराजांनी जे वक्तव्य केले ते योग्यच असून छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देत असताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी देतो,मात्र शिवबंधन बांधा,जी जागा शिवसेनेची आहे शिवसेनेच्या कोट्यातून जाणार असल्याने शिवसेनेचा खासदार जाणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किमान दोन महिने आधीच स्पष्ट निर्णय दिला होता.दुर्दैवाने संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी चालली. दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीला हजेरी लावायचे.मात्र शिवसेनेच्या शिवधनुष्य त्यांना चाललं नाही,हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी खंत व्यक्त केली .

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com