prawns 
महाराष्ट्र

रायगडात कोळंबीचा दर गडगडला, मच्छीमार अडचणीत; खवय्यांची चंगळ

साम टिव्ही ब्युरो

- राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडच्या समुद्रात सध्या मच्छीमारांच्या जाळ्यात कोळंबीचे घबाड सापडत आहे. त्यामुळे मासाळी बाजारात छाेटी कोळंबी मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झालेली आहे. कोळंबीची माेठ्या प्रमाणात आवक झाल्याने व्यापाऱ्यांकडून अपेक्षित असा दर मिळत नसल्याने घबाड मिळूनही मच्छीमार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दरम्यान मासळी बाजारात कोळंबीची आवक वाढल्याने आणि त्यातच स्वस्तात मिळू लागल्याने खवय्यांची चंगळ झाली आहे. fishermen-collects-prawns-raigad-marathi-news-sml80

अलिबागच्या समुद्रात कोळंबी मोठ्या प्रमाणात सापडू लागली आहे. दररोज ३० ते ४० टन बारीक कोळंबी जाळ्यात सापडत आहे. आत्ताच गणेशाेत्सव संपला आहे. गणपतीनंतर चांगला दर मिळेल असे वाटले हाेते मात्र आवक वाढल्याने कोळंबीला हवा तसा भाव आम्हांला मिळत नसल्याने खर्च भागविणे कठीण झाले आहे असे काेळी बांधवांनी नमूद केले.

अलिबाग कोळीवाड्यातून रोज ४० ते ५० बोटी या समुद्रात मासेमारीसाठी जाताहेत. मोठ्या मासळीची आवक घटली असली तरी कोळंबी, मांदेली ही मासळी मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडत आहे. १०-१२ दिवसांपासून कोळंबी मोठ्या प्रमाणात सापडू लागली आहे. व्यापाऱ्यांकडून किलोला फक्त २० ते २५ रुपये दर मिळत आहे. परिणामी डिझेल खर्च, कर्मचाऱ्याचा आणि स्वतःचा खर्च भागविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हांला आर्थिक भुर्दंड बसत आहे असे काेळी बांधवांनी नमूद केले.

येथील व्यापारी म्हणाले समुद्रातुन कोळंबीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोळंबी लहान असल्याने त्याला दर मिळत नाही. कोळंबी सध्या निर्यात होत नसल्याने दर कमी दिला जात आहे. एका किलोला ३०० नग पडले तर ८० ते ९० रुपये दर दिला जातो. किलोला नग वाढले तर दर २० ते २५ रुपये दिला जात आहे. त्यामुळे आवक वाढली असली तरी आणि निर्यात बंद असल्याने मच्छीमारांना दर कमी मिळत आहे.

पावसाळ्यात कोळंबीची पिल्ले तयार झाली असल्याने सध्या या पिल्लाची वाढ होत आहे. त्यामुळे मच्छीमार हा मासेमारीसाठी गेल्यानंतर त्याच्या जाळ्यात ही छोटी कोळंबी मिळत आहे. कोळंबी छोटी मिळत असल्याने आणि निर्यात बंद असल्याने मच्छीमारांना दर मिळत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोळंबी खाणाऱ्या खवय्यांची दर कमी झाल्याने चंगळ झाली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT