Ahmednagar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: आधी झोपेत असलेल्या पत्नी आणि सासूची हत्या, नंतर जावयानेही संपवलं जीवन; घटनेनं अहमदनगर हादरले

Ahmednagar Police: राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

सचिन बनसोडे, अहमदनगर

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये (Ahmednagar) धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि सासूची हत्या करून फरार असलेल्या जावयाने गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कात्रड या गावात जावयाने सासू आणि पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबीक वादातून जावयाने पत्नी आणि सासूचा काटा काढला. संपूर्ण गाव झोपेत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास जावयाने हे क्रूरकर्म केल्याचे पुढे आले आहे.

पत्नी आणि सासूची हत्या करुन जावई फरार होता. पण आता त्याने देखील या दोघांची हत्या करून आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. अहमदनगर शहरातील एमआयडीसी परिसरात गळाफास घेऊन जावायाने आत्महत्या केली. नूतन सागर साबळे (२३ वर्षे) आणि सुरेखा दिलीप दांगट (४५ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या माय- लेकीची नावं आहेत.

सागर सुरेश साबळे असं आरोपी जावई असून त्याने देखील आत्महत्या केली आहे. सासुरवाडीतील घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच आरोपी सागरने त्यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नूतन आणि सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. या दोघींची हत्या करुन सागर फरार होता. पण आता त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शरद पवार गटाच्या 'त्या' तीन आमदारांवर कारवाई होणार? काय आहे प्रकरण?

Monday Horoscope: कोणाच्या नशिबात पैसा, कोणाला सावध राहण्याचा इशारा? वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

Mughal history India: शाइस्ताखानचे खरं नाव काय होतं तुम्हाला माहितीये का?

Monsoon Picnic Spot: पावसाळ्यात महाराष्ट्रातल्या या ७ बेस्ट ठिकाणी नक्की करा फिरायला जायचा प्लॅन

SCROLL FOR NEXT