Farmer  Saam TV
महाराष्ट्र

NAMO Farmer Scheme : नमो-किसान योजनेचा पहिलाच हप्ता टेक्निकल इश्यूमुळे रखडला, ८६ लाख शेतकरी प्रतीक्षेत

Farmer News : राज्यातील जवळपास ८६.६० लाख शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेचा फायदा मिळणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News :

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जाणार आहेत. जेणेकरून शेतकरी सक्षम आणि स्वावलंबी होऊ शकतील.

मात्र या योजनेचा पहिला हप्ताही शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या अंतिम चाचण्या वेळेत न झाल्यामुळे निधी वाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Maharashtra News)

राज्यातील जवळपास ८६.६० लाख शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेचा फायदा मिळणार आहे. यामध्ये दर चार महिन्यांनंतर शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये मिळणाा आहेत. म्हणजेच वार्षिक ही रक्कम ६००० रुपये असेल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.  (Latest News Update)

अॅग्रोवनच्या वृत्तानुसार, ऑगस्टच्या मध्यावधीच्या आत योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळावा, अशी इच्छा सरकारची इच्छा होती. पण आधी आर्थिक तरतूद आणि आता टेक्निकल इशूमुळे शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. महाआयटी याबाबत वेगाने काम करत आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना मदन मिळावी हे उद्दीष्ट आहे.

राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना ‘नमो-किसान’चा लाभ देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून किमान ६०६० कोटी रुपये द्यावे लागतील. सध्या केवळ ४००० कोटींची तरतूद केलेली आहे. सॉफ्टवेअरच्या चाचण्या पूर्ण झाल्यास सध्याच्या उपलब्ध चार हजार कोटींच्या निधीतून शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरणास अडचण येणार नाही.

तोपर्यंत राज्य शासनाकडून उर्वरित २०६० कोटी रुपये मिळू शकतील. त्यातून तिसरा हप्ता देता येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT