Bachchu kadu News Saamtv
महाराष्ट्र

Bachchu Kadu on Maratha Andolan: सर्वात आधी सचिन तेंडुलकरवर गुन्हा दाखल करा, पण...; जालन्यात बच्चू कडू यांचं मोठं विधान

Bachchu Kadu on Maratha Andolan: सर्वात आधी सचिन तेंडुलकरवर गुन्हा दाखल करा, पण आंदोलकांवर गुन्हे नको, असं वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Bachchu Kadu News in Marathi

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. जालन्यातील लाठीहल्ल्याचा विरोधकांनी निषेध केला आहे. जालना लाठीहल्ला प्रकरणी कारवाई देखील सुरु झाली आहे. याचदरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना सर्वात आधी सचिन तेंडुलकरवर गुन्हा दाखल करा, पण आंदोलकांवर गुन्हे नको, असं वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले. (Latest Marathi News)

बच्चू कडू यांनी जालन्यात आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले, 'वेगळा कायदा करण्याच्या भानगडीपेक्षा एक निर्णय घेण्याची गरज आहे. यातून ही भानगड मिटू शकते. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाशी बोललो आहे. जे मराठे आहेत, त्यांच्या दफ्तरी नोंदी कुणबी येत आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे. शिंदे सरकारवर विश्वास आहे, विशेषतःमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे'.

'जातीची लढाई नाही लढलो, पण दिव्यांगाची लढाई लढलो. मला विश्वास आहे, मुख्यमंत्री शिंदे याच्यावर तोडगा काढतील. आम्ही सुद्धा अपक्ष आमदार त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. या लढाईसोबत शेतकऱ्यांची देखील दुष्काळाशी लढाई आहे, असे ते म्हणाले.

आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, त्यावर भाष्य करताना म्हणाले, 'गुन्हा दाखल करायचा असेल तर तो आधी सचिन तेंडुलकरवर करा , पण या आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे नको, अशी विनंती बच्चू कडू यांनी केली.

'अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढायचा आहे. मी तुम्हाला सांगेल की फोटो लांबून काढा. कारण उपोषण मीही केलं आहे,मला माहिती आहे की उपोषण काय असतं. वेळ पडली तर मी पण एक दिवस उपोषण करेल. सरकारला सांगतो, अंत बघू नका नाहीतर सरकारचा अंत होईल, असे बच्चू कडू पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : प्रेमामध्ये अखंड बुडून जाल, दक्षता बाळगा; 'या' राशींच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Tuesday Horoscope Update : पैशांवर नियंत्रण ठेवा अन्यथा..., वाचा यात तुमची तर रास नाही

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

SCROLL FOR NEXT