Coca Cola Plant in Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Coca Cola: महाराष्ट्रात 'कोका कोला'ची पहिलीच फॅक्टरी, किती होणार रोजगार निर्मिती? काय होणार फायदा, जाणून घ्या...

साम टिव्ही ब्युरो

Coca Cola Plant in Maharashtra :

भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने (एचसीसीबी) महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील एमआयडीसी लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील आगामी ग्रीनफील्ड कारखान्यासाठी भूमिपूजन समारंभ आयोजित केला. या समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. एचसीसीबीचे सीईओ जुआन पाबलो रॉड्रिग्ज यांच्यासह कंपनीचे अनेक वरिष्ठ अधिकारीही समारंभात उपस्थित होते.

हा कारखाना फेब्रुवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे आणि त्यामुळे एचसीसीबीच्या उत्पादन क्षमतांमध्ये मोठी वाढही होणार आहे. त्याचप्रमाणे शाश्वत विकासाप्रती कंपनीही बांधिलकीही या कारखान्यामुळे अधिक दृढ होणार आहे. १,३८७ कोटी रुपयांच्या अपेक्षित गुंतवणूकीतून उभारला जाणारा हा कारखाना ८८ एकर जागेत असेल. हा कारखाना ३५० व्यक्तींसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असेही अपेक्षित आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रातील समृद्ध परिसरात स्थापन केला जाणारा हा कारखाना वसिष्ठी नदीतील पाण्याचा वापर करणार आहे. एमआयडीसी पाइपलाइनद्वारे कारखान्याला हे पाणी पुरवले जाईल. या धोरणात्मक निर्णयातून एचसीसीबीची पर्यावरण शाश्वततेप्रती आणि कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनाप्रती बांधिलकी अधोरेखित होते.

एचसीसीबी महाराष्ट्रात अनेक समुदाय उपक्रमही राबवणार आहे. शैक्षणिक पायाभूत सुविधा, पाण्याचे एटीएम्स, शाश्वत शेती आणि समुदाय संवाद केंद्र यांसारख्या उपक्रमांमुळे ८१,००० जणांच्या आयुष्यांवर सकारात्मक परिणाम होणार आहेत. लोटे भागातील १०,००० जणांना या उपक्रमांचा थेट लाभ होणार आहे. एचसीसीबी १४ गावांतील ३,००० स्त्रियांना डिजिटल व आर्थिक कौशल्यांनी सुसज्ज करणार आहे, तर २,५०० तरुणांना विक्री व मार्केटिंगचे प्रशिक्षण देणार आहे.  (Latest Marathi News)

महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “हा केवळ औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा नाही, तर औद्योगिक वाढ व सामाजिक कल्याण यांतील समन्वयात्मक संबंध जोपासण्याप्रती महाराष्ट्र सरकारची बांधिलकी यातून दिसून येते. आपण आपला औद्योगिक व सामाजिक विकासाचा अजेंडा सातत्याने पुढे नेत राहणार असल्यामुळे एचसीसीबीसारख्या कंपन्या निभावत असलेल्या भूमिकेचे मोल महाराष्ट्र सरकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला शाश्वत व न्याय्य वाढीचा दीपस्तंभ करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ मिळत आहे.”

महाराष्ट्र सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “आमच्या प्रशासनातील महाराष्ट्राचे उद्दिष्ट एक प्रगतीशील व स्थितीस्थापक राज्य उभारणे हे आहे. केवळ आर्थिकदृष्ट्या वाढणारे नव्हे तर समाजाच्या कल्याणाची खात्री करणारे राज्य होण्याची आमची इच्छा आहे. आमची धोरणे ही दुहेरी बळातून घडवली जातात. यातील एक म्हणजे आर्थिक वाढीला उत्तेजन देणे तर दुसरे म्हणजे आमच्या समुदायांची सामाजिक वीण सुरक्षित राखणे होय. एचसीसीबीचा विस्तार या उद्दिष्टाशी तंतोतंत मिळताजुळता आहे, ही बाब सुखद आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaradhya Bachchan Net Worth : 13 वर्षांची आराध्या बच्चन आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा किती?

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT