solapur, fire brigade, petrol tanker, indian oil, pakni saam tv
महाराष्ट्र

Solapur Breaking News : सोलापूरला निघालेला पेट्राेलचा टॅंकर पेटला; परिस्थिती नियंत्रणात

आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास घडली घटना.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : पाकणी येथून सोलापूरच्या (solpaur) दिशेने निघालेल्या पेट्राेलच्या (petrol) टॅंकरने अचानक पेट घेतला. या गाेष्टीचा चालकास अंदाज आल्याने त्याने रस्त्याच्या कडेला टॅंकर उभा केला. काही काळानंतर अग्नीशमन दलाने (fire brigade) आग (fire) आटाेक्यात आणली. (solapur latest marathi news)

या घटनेबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी : उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी जवळील इंडियन ऑइलच्या डेपोतून एकूण २४ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल घेऊन आज (मंगळवार) सकाळी एक टँकर बाहेर पडला.

सोलापूरच्या दिशेने पूलानजीकच्या सेवा रस्त्यावरुन निघालेल्या टँकरने अचानक पुढच्या बाजूस पेट घेतला. चालकाच्या केबिनला आग लागली. त्यामुळे चालकाने आगीचा अंदाज घेत जागेवरच टॅंकर थांबावला. त्यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला टँकर लावला आणि बाहेर पडला.

त्यानंतर क्षणार्धात पूर्ण केबीननं पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. यावेळी पूलावर आग लागलेला टॅंकर पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली हाेती. या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळाल्यानंतर दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी आग आटाेक्यात आणली. या टॅंकरची केबीनची राख रांगाेळी झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT