nandurbar, fire saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Fire News : थुवनीत घराला भीषण आग; आदिवासी शेतकऱ्याचा टेकडीवरील उभा संसार जळून खाक

ही आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव थुवनी गावातील करसन्या नाऱ्या पाडवी या आदिवासी शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Maharashtra News)

करसन्या नाऱ्या पाडवी यांचे गरीब कुटुंब असुन मोसमी डोंगराळ शेती करून उदरनिर्वाह करते. घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू, धान्य,कपडे आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग लागताच जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

परंतु करसन्या नाऱ्या पाडावी यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने राैद्ररुप धारण केले. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंसह धान्याची राख झाली.

या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. करसन्या नाऱ्या पाडवी याच्या परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून खाक झाला. महसूल विभागाच्या वतीने आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा हाहाकार! १६ जिल्ह्यांना रेड- ऑरेंज अलर्ट, मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Bhandara : रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर धक्कादायक प्रकार आला समोर; मुलीच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखलगुन्हा दाखल

Maharashtra Rain Live News: रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला; आंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली

सौरमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह कोणता?

Flood Video : पुराच्या पाण्यातून वाट काढत होता, बघता बघता वाहून गेला तरूण; थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT