fire news  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Fire News: तासगावात फटाक्यांच्या दारू गोडाऊनला भीषण आग

Sangli Fire News: फटाके तयार करण्यासाठी लागणाऱ्या दारूच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

Fire Broke out Firecrackers Godown :

सांगलीच्या तासगाव येथे असलेल्या फटाके तयार करण्यासाठी लागणाऱ्या दारूच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडलीय. हा दारू कारखाना येथील भर वस्तीत आहे. महेश सुरेश कोकणे याच्या मालकीचं हे गोडाऊन आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्नीशमन दल घटनास्थळी वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. (Latest News)

महेश कोकणे यांचे सोमवार पेठेत फटाके तयार करण्यासाठी लागणाऱ्या दारूचे गोडाऊन आहे. कोकणे हे अन्य दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दारू पुरवितात. याशिवाय ते याठिकाणी त्याचा साठा करून ठेवतात. कोकणे याचे हे दारूचे गोडाऊन शहराच्या मध्यवस्तीत आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमरास कोकणे याच्या गोडाऊनमधील दारूला आग लागली. दारू अतिशय स्फोटक असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची माहिती मिळताच पालिकेच्या दोन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्नीशमन दलाच्या जवानांनी रस्ता अपुरा असतानाही मोठ्या प्रयत्नाने आग शमवली. दरम्यान गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दारू साठा असल्याने अधूनमधून दारूचे मोठे स्फोट होत होता. रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन जवानांना यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT