pune bangalore national highway  saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway : प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून पुण्याकडे निघाली होती एसटी बस; आनेवाडी टाेल नाक्याजवळ घेतला पेट

Satara Breaking News : बसने पेट घेतल्यानंतर काही काळ महामार्गवरील वाहतूक खाेळंबली.

Siddharth Latkar

Satara News : पुणे-बंगळुरू महामार्गावर (Pune Bangalore National Highway) आज (साेमवार) आनेवाडी टाेल नाका (anewadi toll plaza) येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (msrtc bus) अचनाक पेट घेतला. दरम्यान बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांना अन्य बसमधून रवाना करण्यात आले आहेत. (Maharashtra News)

आज सकाळी अकरा, सव्वा अकराच्या सुमारास ही घटना आनेवाडी टाेल नाक्याजवळ घडली. घटना घडल्यानंतर नागरिकांनी पाेलिसांना याची माहिती दिली. काही नागरिकांनी सातारा पालिका तसेच भुईंज सहकारी साखर कारखाना येथील फायर ब्रिगेडला घटनेची माहिती दिली.

काही वेळानंतर फायर ब्रिगेडची एक गाडी घटनास्थळी पाेहचली. ताेपर्यंत संपुर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. आगीचे लाेट महामार्ग परिसरात पसरले. त्यामुळे अनेक वाहनधारक घटना त्यांच्या माेबाईमध्ये टिपताना दिसले.

दरम्यान ही बस काेल्हापूरहून (राधानगरी) स्वारगेटला निघाली हाेती अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या बसने पेट घेताच प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर बसमधील प्रवाशांना अन्य बसमधून पाठविण्यात आल्याचे घटनास्थळावरील नागरिकांकडून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT