Parbhani Fire News saam tv
महाराष्ट्र

Parbhani Fire News: परभणीत आग्नितांडव: कपड्याच्या कारखान्यात भीषण आग, घरांनाही बसली झळ

या घटनेत मशीन, कच्चा व तयार माल जळून खाक झाला आहे.

राजेश काटकर

Parbhani News :

परभणी शहरातील जिंतूर रोडवरील जाधव गारमेंटला आज सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने जाधव गारमेंटमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.  (Maharashtra News)

शहरातील जिंतूर रोडवरील खाँजा कॉलनीत प्रशांत जाधव यांच्या जाधव गारमेंटला या कपड्याच्या कारखान्याला आग लागल्याची वार्ता परभणी शहरात पसरली. त्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली.

या आगीने राैद्ररुप धारण केले हाेते. या घटनेत कपडे जळून खाक झाले. या आगीचा फटका नजीकच्या दोन घरांना देखील बसला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेत मशीन, कच्चा व तयार माल जळून खाक झाला आहे. सुमारे पन्नास ते पंचावन्न लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अशी प्राथमिक माहिती प्रशांत जाधव यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. दरम्यान या आगीची झळ बसलेल्या घरांचे देखील नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : नागपुरात अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच महासत्संग आयोजन

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

SCROLL FOR NEXT