fire crackers factory, tandali village, akola, patur  saam tv
महाराष्ट्र

Akola Fire Crackers Factory: तांदळीत फटाका कारखान्यात स्फोट, एक ठार, सात जखमी; दाेघे गंभीर

पातूर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

जयेश गावंडे

Akola News : अकोल्यातील (akola) पातूर (patur) तालुक्यातल्या तांदळी (tandali village) गावाजवळ असलेल्या फटाक्याच्या कारखान्यांमध्ये (fire crackers factory) झालेला ब्लास्टमुळे एक मजूर ठार झाला आहे. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

तांदळीतील फटाक्याचा कारखान्यात काम सुरू असताना आज (मंगळवार) अचानक आग लागली. ही आग स्फोटामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटात शेख रज्जाक शेख गुलाब (५८, रा. अकोट फैल अकोला) हे जागेवरच मृत्यूमुखी पडले आहेत.

या घटनेत दादाराव नवघरे (६५, रा. तांदळी), नवीन कुमार (२८, रा. बिहार) हे दाेघे गंभीर जखमी झाले. तसेच धम्मपाल सीताराम खंडेराव (३६), सुरेश नामदेव दामोदर (५३), रुपेश शालिग्राम डाबेराव (३५), मंगेश भिमराव खंडेराव (३२), रिना रुपेश खंडेराव (३०) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

या स्फोटात अंदाजे २० ते २५ लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे .घटनेची माहिती मिळताच पातूरच्या रुग्णवाहीकेचे डॉ. फैजान जगीरदार, चालक धीरज बंड, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विजय खेडकर, मुजहीद खा आणि पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी, सहा. ठाणेदार गजानन पोटे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. आगीचे अधिकृत कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पातूर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर प्रशासनाकडून दर्शन नियमात मोठा बदल, VIP दर्शन पूर्णपणे बंद, काय आहे कारण?

दिशा पटानीसारखी स्लिम-फिट फिगर हवीये? सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' 1 स्पेशल डिटॉक्स ड्रिंक!

Shocking: खेड शिवापूर टोल नाक्यावर ऑन ड्युटी असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला

Maharashtra News Live Update: अनंत कळसेंना लोकउपायुक्त पदाची ऑफर?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याची ऑनलाइन फसवणूक; ५० हजाराचं घड्याळ निघालं नकली, VIDEO शेअर करत सांगितला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT