निलंगा तालुक्यात दोन अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीस तपासाला वेग दिपक क्षीरसागर
महाराष्ट्र

निलंगा तालुक्यात दोन अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीस तपासाला वेग

लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दोन गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुरूषांचे दोन मृतदेह आढळुन आले आहेत.

दिपक क्षीरसागर

लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दोन गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुरूषांचे दोन मृतदेह आढळुन आले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत. निलंगा तालुक्यातील मांजरा नदीपात्रात गिरकचाळ येथे कोल्हापुरी बंधाऱ्यात पाण्यामध्ये तरंगत असलेले अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळले आहे. तर अंबुलगा बु. कारखाना येथील लांबोटा तोगरी मोड हायवेच्या कडेला असलेल्या झुडपामध्ये सदर पुरुष जातीचे प्रेत आढळले असून गिरकचाळ येथील पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. तर दोन्ही ठिकाणच्या मयतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

सदरील दोन्ही व्यक्तीची हत्या की आत्महत्या हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. पोलिस प्रशासन सोशल मिडियाच्या माध्यमातून सदरील दोन्ही प्रेताची ओळख पटवण्यासाठी माहिती प्रसारीत करत आहे. अद्याप तरी ओळख पटली नसून त्सासाठी शिरूरअनंतपाळ व निलंगा पोलिस प्रयत्न करत आहेत. ओळख न पटलेल्या व बेवारस दोन्ही प्रेताचा पंचनामा करून पोलिसांनी प्रेत ताब्यात घेतले असून उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. कारखाना परिसरात आढळलेल्या प्रेताच्या पँटच्या खिशात पिस्तूल कंपनीची काडीपेटी सापडली असून यावर तपास लावण्यास पोलिसांना सोपे जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinod Tawde Money Distribution : १५ कोटी वाटल्याचा तावडेंवर आरोप, विरोधक म्हणतात मान्य करा; भाजप म्हणाले, पैसे वाटायला जातीलच का

Health Tips: हिवाळ्यात भाजलेले हरभरे खा; 'हे' आजार राहतील कोसो दूर

International Men's Day 2024: सावधान; 'या' आजारचे पुरुष ठरू शकतात बळी...

Mathira Viral Video: टिकटॉक स्टार इम्शा रहमानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक; व्हिडीओ होतोय व्हायरल

Maval Vidhan Sabha : मावळचा गड यंदा कोणाकडे?; महायुतीतील राष्ट्रवादीसोबत अपक्षांची झुंज, आघाडीही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी

SCROLL FOR NEXT