मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा; प्रशांत बंब यांची मागणी डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा; प्रशांत बंब यांची मागणी

यासाठी शासनाने 17 फेब्रुवारी 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित करून तशा सूचना दिल्या होत्या.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - 2019 च्या राज्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकरी Farmer बांधवांना देण्यात आलेल्या मदतीचे निकष विचारात घेता त्याच धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तीन पट रक्कम मदत म्हणून तात्काळ जाहीर करून याचा हप्ता तात्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करावा अशी मागणी औरंगाबादचे Aurangabad पालकमंत्री सुभाष देसाई Subhash Desai यांच्या Vc द्वारे झालेल्या आढावा बैठकीदरम्यान आमदार प्रशांत बंब Prashant Bamb यांनी केली आहे.

हे देखील पहा -

एनडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 6800 तसेच बागायती क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टर 13500 रुपये देण्याबाबत नियम करण्यात आला आहे. मात्र 2019 मधील जुलै ते ऑक्टोबर मधील अतिवृष्टी तसेच पूर बाधित व्यक्तींना मदत व्हावी या अनुषंगाने शासन मान्यतेनुसार नियमा व्यतिरिक्त तीन पट रक्कम देण्यात आली होती. यासाठी शासनाने 17 फेब्रुवारी 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित करून तशा सूचना दिल्या होत्या.

याच धर्तीवर मराठवाड्यातील अतिवृष्टी धारक शेतकरी बांधवांना तात्काळ मदत घोषित करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती प्रत्यक्षात वर्ग कशी करता येईल याबाबत कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी प्रशांत बंब यांनी पालक मंत्री महोदयांना केली आहे. हा धोरणात्मक निर्णय असून याची राज्यस्तरावर अंमलबजावणी करावी ही विनंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT