अनिल मुळे आत्महत्या प्रकरण दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

दोषी अधिकाऱ्यांची CID चौकशी करून गुन्हे दाखल करा; अनिल मुळे आत्महत्या प्रकरण

लातूरच्या उदगीर तालुक्यातील तोंडार येथील सुपुत्र व अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल मुळे आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी व स्थानिक नेत्यांनी केली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडार येथील सुपुत्र व अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल मुळे आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तोंडार येथील ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटना आणि आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे, की पोलिस अधिकाऱ्यांच्या वतीने बदनामी करण्याच्या उद्देशाने जाणून बुजून एका महिलेला त्यांच्या विरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार द्यायला लावली. या प्रकरणात दोषी नसतानाही त्यांची बाजूं ऐकून न घेता त्यांची वेतनवाढ रोखून प्रमोशनला अडथळा निर्माण केला. त्या महिलेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.

हे देखील पहा -

पोलीस निरीक्षक मेश्राम व डीसीपी सातव यांनी वेतन वाढ रोखून बदनामी करून मानसिक त्रास दिला. त्यांची सीआयडी चौकशी करून त्यांना निलंबित करावे, १३ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्यानंतर त्याच रात्री (कै) मुळे यांच्या निवासस्थानी बेकायदेशीरपणे जाऊन त्यांचे लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून ती जप्ती केली व त्यातील सर्व पुरावे नष्ट केले, त्या लॅपटॉपची छेडछाड करण्यात आली. त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्या मोबाईलची सर्व माहिती व सीडीआर तपासावे त्यांनी आत्महत्या केली असे असले तरी त्यांचा घातपात व खून असु शकतो.

याबाबत कसून चौकशी करण्यात यावी, अनिल मुळे यांना प्रचंड मानसिक त्रास दिला असल्याने त्यांनी आत्महत्या केली त्या अगोदर नक्की सुसाईड नोट लिहून ठेवली असेल मात्र ती नष्ट करण्यात आली असावी त्याचा तपास करण्यात यावा, यात नेमण्यात आलेले तपास अधिकारी एसीपी दर्जाचे असून ते वरिष्ठांची चौकशी कशी करू शकतात असा सवालही निवेदनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तपास अधिकारी श्री गायकवाड यांनी अमरावती येथील सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर अनिल मुळे यांच्या विरोधात काही कागदपत्र वायरल केले आहेत.

त्यांचे स्क्रीनशाॅट सुद्धा काढून ठेवण्यात आले आहेत. तपास अधिकारी यांनी हे करणे योग्य आहे का? तपास हाती येताच तक्रारीत तथ्य नसल्याची घोषणा केली, नातेवाईकांचे जवाब घेण्यापूर्वीच तथ्य नसल्याचे सांगणारे तपास अधिकारी गायकवाड यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशा विविध पंचवीस मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी आमदार मनोहर पटवारी, लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, ऍड.शिवानंद हैबतपुरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, कुणाल बागबंदे, अमोल निडवदे, उदयसिंह ठाकुर, नागेश अष्टुरे, श्रीकांत पाटील, राजकुमार बिरादार बामणीकर, तोडार येथील उपसरपंच निळकंठ बिरादार, आनंदराव मालोदे, माधव पाटील, माधव पटवारी, शिवकुमार पांडे, विलास खिडे, शिवलिंग हैबतपुरे, संदीप बिरादार आदींची नावे आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: आज 'या' राशी होणार मालामाल; वाचा आजचे राशीभविष्य

दया दरवाजा तोड दो! CID चा मुहूर्त ठरला; चोर पोलिसांचा खेळ पुन्हा सुरू,कधी अन् कुठे पाहा

Maharashtra Election Results : राष्ट्रवादी- शिवसेना फूट भाजपच्याच पथ्यावर, काँग्रेससाठी धोक्याची घंटा

Horoscope Today: आज उजळणार 3 राशींचं नशीब; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

Maharashtra Election Results : न भूतो न भविष्य! महायुतीचा तब्बल २३५ जागांवर विजय, मविआ चारीमुंड्या चीत

SCROLL FOR NEXT