Sambhaji Bhide News Saam TV
महाराष्ट्र

Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंविरुद्ध उच्च न्यायालयात दावा दाखल करणार : डॉ. कुमार सप्तर्षी

Sambhaji Bhide Latest News: उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांनी दिली.

Ruchika Jadhav

प्राची कुलकर्णी

Pune News: महात्मा गांधींच्या वडलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जातोय. अशात त्यांच्यावर उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आज गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना दिली. (Latest Marathi News)

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त असून त्यांनीही भिडेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय. संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे शिवाजी महाराजांवर वार करणाऱ्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचे वंशज असल्याचा संशय त्यांच्या वर्तनावरून येत आहे. ते मनोरुग्ण आणि विकृत आहेत, अशी टीका डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केली आहे.

विचारसरणी संपविण्याचे कटकारस्थान सुरू

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता म्हणून आदरणीय असून त्यांची विचारसरणी संपविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. या मागे देवेंद्र फडणवीस आणि संघ आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगली पेटविण्याची तयारी सुरू असून वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण गढुळ केले जात आहे, असं डॉ. सप्तर्षी यांनी सांगितलं.

संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल

महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर आता संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी अमरावतीतीत राजापेठ पोलिसांनी भीडेंविरोधात कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तसेच संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा धसका, CM फडणवीसांनी सांगितला निवडणूक प्लान | VIDEO

SCROLL FOR NEXT