MLA Narayan Kuche News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजप आमदार नारायण कुचेंवर गुन्हा दाखल करा; शिवसेना नेत्याचं थेट शिंदे-फडणवीसांना पत्र

MLA Narayan Kuche News: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तोतयाने भाजप नेत्यांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

MLA Narayan Kuche News: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तोतयाने भाजप नेत्यांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी नीरजसिंग राठोड नामक एका व्यक्तीला अटक केली. आरोपीने भाजपच्या चार आमदारांकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती.

यातील काही आमदारांनी आरोपीला पैसेही पाठवल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर भाजप आमदार नारायण कुचे यांनी माध्यमांशी आपण सुद्धा आरोपीला पैसे दिल्याची कबूली दिली. आमदार कुचे यांनी आरोपीला गुगल-पे आणि पेटीएमच्या माध्यमातून ५० हजार रुपये दिले असल्याचं सांगितलं. (Breaking Marathi News)

दरम्यान, नारायण कुचे यांच्या या कबुलीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. कुचे यांनी मंत्रिपदासाठी पैसे दिल्याचे मान्य केल्याने त्यांच्याविरुद्ध लाच देण्याचा गुन्हा दाखल करावा, तसंच त्यांच्या बँक खात्याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना आमदार संतोष साबरे यांनी केली आहे.

संतोष साबरे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. आमदार नारायण कुचे यांनी मंत्रिपदाच्या लालसेपोटी आरोपी नीरज याला किती पैसे दिले? याची चौकशी व्हावी असंही साबरे यांनी पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे नारायण कुचे यांच्या अडचणीत वाढ होते का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Maharashtra Political News)

कोण आहे मंत्र्यांना फसवणारा नीरज राठोड?

नीरज टाइल्सच्या दुकानात काम करतो. तो तासंतास वाहिन्यांवरील राजकीय वृत्तांकन बघतो. इंटरनेटद्वारे त्याने अनेक आमदारांची माहिती व त्यांचे मोबाइल क्रमांक गोळा केले आहेत. याशिवाय जे. पी. नड्डा यांचा आवाज काढण्याचाही सराव केला आहे.

‘साहेबांशी बोला’ असे सांगून तो स्वत:च नड्डा यांचा आवाज काढून आमदारांशी बोलायचा. त्याने एका आमदाराला दिल्लीला बोलावून राज्य उत्पादन शुल्क विभाग देण्याचे आमिष दिले. त्या लालसेने या आमदाराने दिल्लीला जाण्याचीही तयारी केली होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT