Beed: शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा- पंकजा मुंडे - Saam Tv
महाराष्ट्र

Beed: शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा- पंकजा मुंडे

कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करावा

विनोद जिरे

बीड: बीड (Beed) जिल्ह्यात वाळू (sand) माफियांचा उच्छाद कसा सुरुय? हे कालच्या दुर्दैवी घटनेने समोर आले आहे. वाळू उपश्यासाठी सिंदफना नदीत (Sindfana river) खोदलेल्या खड्ड्यात, बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात असणाऱ्या शहाजानपूर चकला (Shahjahanpur Chakla) गावात (village), 4 ऊसतोड कामगारांच्या मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या प्रकरणी त्या शाळकरी (School) मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे. (File 302 case against sand causing deaths school children)

हे देखील पहा-

त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलंय आहे, की गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. नदीपात्रात अवैधरित्या खड्डे खोदून वाळूचा सर्रास उपसा चालू आहे. सत्ताधारी किंवा प्रशासन (Administration) त्यांचेवर कसलीच कारवाई करत नसल्याने, त्यांचे धीटपणा हा वाढला आहे. वाळू माफियांनी खोदलेल्या नदीपात्रातील खड्डय़ात पडून गेवराई तालुक्यातील शहाजानपूर येथील ४ शाळकरी मुलांचा नुकताच दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

ही घटना अतिशय संतापजनक आहे. प्रशासन आणि वाळू माफिया अजून किती जणांचे बळी घेणार आहे? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी प्रशासनाने मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली असून मृत्यु झालेल्या त्या मुलांच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त केले आहेत. दरम्यान प्रशासन आता काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT