gram panchayat election result 2022, hingoli, shivsena , ncp  saam tv
महाराष्ट्र

ग्रामपंचायत निकालानंतर शिवसेना एनसपीत राडा; पाेलिस अधिका-यासह तिघे जखमी

पोलिसांनी यातील अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वनाथ झुंजारे (पोलीस निरीक्षक, औंढा) यांनी दिली.

संदीप नागरे

Hingoli : हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील निळोबा चिंचोली गावात ग्रामपंचायत (grampanchayat) निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. ही हाणामारी होत असताना भांडण रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना देखील पराभूत उमेदवारांकडून लक्ष करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर औंढा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हिंगोली जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीचा निकाल (Gram Panchayat Election Results 2022) साेमवारी दुपारी लागला. यामध्ये निळोबा चिंचोली या गावच्या ग्रामपंचायतीचा देखील समावेश होता. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाची शिवसेना (shivsena) विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली.

त्यामध्ये राष्ट्रवादीच्या (ncp) उमेदवाराने ठाकरे गटाचा पराभव केला. हा पराभव शिवसेना उमेदवाराच्या इतका जिव्हारी लागला की, त्यांनी विजयी उमदेवार गावात विजयाच्या घोषणा देत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला असता पराभूत गटाने पोलिसांना लक्ष केलं.

या घटने प्रकरणी पोलीस कर्मचारी रवी इंगोले यांच्या तक्रारीवरून चिंचोली गावातील वीस ते पंचवीस जणांविरुद्ध पोलिसांच्या बंदोबस्तात व्यत्यय आणून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वनाथ झुंजारे (पोलीस निरीक्षक, औंढा) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

SCROLL FOR NEXT