nashik, malegoan, crime news saam tv
महाराष्ट्र

Malegoan : दाेघांच्या वादात मेव्हण्यावर हल्ला; निहाल नगर भागात गाेळीबार ?

हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

साम न्यूज नेटवर्क

- अजय सोनवणे

Malegoan : मालेगाव (malegoan) येथे काैटुंबिक वादातून मारामारी (fighting) झाली. या मारामारीनंतर जमाव जमला. त्याला पांगविण्यासाठी गाेळीबार झाल्याची घटना घडल्याची चर्चा शहरभर पसरली आहे. या प्रकरणाचा पाेलीस कसून तपास करीत आहेत.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी : नाशिकच्या मालेगाव मधील सर्व्हे नंबर 55 च्या निहाल नगर भागात पती- पत्नीच्या कौटुंबिक वादातून मेव्हण्यावर कटरने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मेव्हणा सरताज सत्तार शेख या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान हल्लेखोरांनी जमाव पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा आरोप जखमी सरताज व परिसरातील नागरिकांनी केला आहे. हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गाेळीबार झाला की नाही याचा पोलीस तपास करीत असून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चौकशी अंती तसा गुन्हा दाखल केला जाईल असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

Maharashtra News Live Update: मिरजगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? उद्धव ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा?

SCROLL FOR NEXT