Sugar Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Sugar Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली; नेमंक कारण काय?

Sugar Price: साखरेच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. साखर २ ते ३ रुपयांनी महागली आहे. सणासुदीच्या काळात साखर महागल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Priya More

Summary -

  • सणासुदीच्या आधीच साखरेच्या दरात २-३ रुपयांची वाढ.

  • उत्पादन घट आणि खर्चवाढीमुळे दरवाढ.

  • गणेशोत्सवात मिठाई महाग होण्याची शक्यता.

सचिन जाधव, पुणे

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखर किलोमागे २ रुपयांनी महागली आहे. येत्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर आणखी वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना गणेशोत्सवापूर्वीच महागाईच्या झळा लागण्यास सुरूवात झाली आहे. सणासुदीच्या काळात साखर महागल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सणासुदीच्या काळात साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सवापूर्वीच साखरेचे दर महागले आहेत. सणासुदीच्या काळात मिठाई आणि प्रसादामध्ये साखरेचा वापर केला जाते. आता साखर महागल्यामुळे सर्वासामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. साखरेच्या दरात किलोमागे २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कारखानदारांकडून साखरेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेचे भाव कडाडले आहेत.

तसंच, केंद्र सरकाराने साखरेचा मासिक कोटा कमी केल्याने दरवाढ झाली असल्याने नागरिकांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत साखरेचे दर आणखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून साखर उत्पादन कमी होत आहे त्याचाही फटका बसत आहे. उत्पादन खर्च महागल्यामुळे येणाऱ्या काळात साखरेची आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP आंदोलन करणार की थांबवणार, कोर्टाच्या बंधनानंतर दीपके काय करणार?

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT