saam tv
महाराष्ट्र

FDAची थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धडक कारवाई; एक्सपायर अन्नपदार्थ आढळल्यानं परवाना रद्द

FDA Action On Palghar Collectorate Canteen: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली. कॅन्टीनमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आणि अस्वच्छता आढळून आली आहे.

Bharat Jadhav

  • पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर एफडीए कारवाई

  • मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने कॅन्टीनचा परवाना रद्द

  • सरकारी कार्यालयातील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता उघड

पालघर अन्न व औषध प्रशासनाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धडक कारवाई केली आहे. कॅन्टीनमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आणि अस्वच्छता आढळल्यानंतर कॅन्टीनचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलाय. सरकारी कार्यालयातील कॅन्टीनमध्ये अस्वच्छतेचा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आलाय.

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या पालघरच्या पथकाने २४ जुलै रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनची तपासणी केली. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांची चाचणी घेण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली.

या तपासणीदरम्यान कॅन्टीनमधील धक्कादायक प्रकार समोर आला. कॅन्टीनच्या साठा कक्षात मुदतबाह्य अन्नपदार्थ कॅन्टीनमध्ये होते. त्यामुळे एफडीएनं कॅन्टीनचा परवाना रद्द केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो नागरिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी अन्नासाठी या कॅन्टीनमध्ये जेवणासाठी येत असतात. अशा ठिकाणी अस्वच्छता दिसल्यानं एफडीएनं कारवाई केलीय.

एक्सपायर अन्नपदार्थांसह कॅन्टीनच्या स्वयंपाकघरामध्ये अस्वच्छता असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अन्न तयार करणे, त्याची साठवणूक करणे आणि हाताळण्याची पद्धतही चांगली नव्हती. अन्न सुरक्षेच्या नियमांचा थेट भंग झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कॅन्टीनचा FSSAI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केलाय.

आधीही आल्या होत्या तक्रारी

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उपहारगृह आहे. त्यामधील खाद्यपदार्थ व पेय विविध शासकीय बैठकीच्या वेळी तसेच इतर कार्यक्रमाच्या वेळी पुरविले जाते. जिल्हाभरातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना देखील या कॅन्टीनमध्ये जेवणासाठी येतात. या कॅन्टीनच्या स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत अनेकांना तक्रारी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? मोदींच्या मनात फडणवीसच शिक्षणमंत्री

पेपरफुटीनंतर GenZच्या निशाण्यावर इथेनॉल, CJPच्या धर्तीवर E-20 जनता पार्टी

Maharashtra News Live Update:

SCROLL FOR NEXT