तुम्हीही ह्दयविकार, मधुमेह आणि रक्तदाबासाठी औषधं घेत असाल तर थांबा. कारण तुम्ही घेत असलेल्या गोळ्या बनावट असू शकतात. असाच एक प्रकार जेजुरीत समोर आलाय...विनापरवाना आणि बनावट औषध निर्मिती करणाऱ्या 'इंडयूकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन' या कंपनीचा औषध उत्पादन परवाना FDAनं रद्द केलाय. मात्र या कारवाईआधी कंपनीत विनापरवाना बनावट औषधांची कशी निर्मिती सुरु होती? पाहूयात.
FDAनं 'इंडयूकेअर' कंपनीच्या युनिटची तपासणी केली
तपासणीत उत्पादन पद्धतीसंदर्भात 25 गंभीर त्रुटी आढळून आल्या
परवानगीशिवाय 9 प्रकारच्या औषधांचे उत्पादन आणि विक्री उघड
काही गोळ्यांमध्ये आवश्यक सक्रीय घटक आढळलेच नाहीत, तर काहींमध्ये अत्यंत कमी प्रमाणात घटक सापडले आहेत.
Ibucare Plus, Carevita-M ही औषधं बनावट असल्याचं आणि महत्त्वाचे घटक गायब असल्याचं उघड
याप्रकरणी 29 ऑक्टोबर 2026 रोजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
दुसरीकडे याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान 'रुग्णांची तक्रार आलेली नाही' हा कंपनीचा युक्तिवाद परवाना प्राधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. कारण तक्रार नसली तरी बनावट आणि कमी प्रभावी औषधांमुळे उपचार निष्फळ ठरण्याचा मोठा धोका असतो. अखेर २३ नोव्हेंबरच्या आदेशानुसार औषध प्रशासनाच्या पुणे सहआयुक्तांनी कंपनीचा परवाना रद्द केलाय.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातही याच कंपनीने औषधांचा पुरवठा केल्याची माहिती समोर येत असल्यानं रुग्णांच्या आरोग्याशी हा खेळ कधीपासून सुरु होता? असा प्रश्न निर्माण झालाय. मुळात 'नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे देणं ही एफडीएची सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे इंडयूकेअर कंपनीचा हा गोरखधंदा कुणाच्या आशीर्वादानं सुरू होता? य़ा औषधांचा पुरवठा नेमक्या कोणत्या रुग्णालयांमध्ये आणि कोणत्या मेडिकल स्टोअर्सपर्यंत पोहोचलाय याचा सखोल तपास व्हायला हवा. अन्यथा रुग्णांच्या जीव धोक्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.