Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Farmer : स्कायमेट वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवले, अकोल्यात २ हजार शेतकऱ्यांचं नुकसान

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात स्कायमेट वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवल्याने पावसाची नोंदच झाली नाही. परिणामी २ हजारांपेक्षा जास्त शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • स्कायमेट वेदर स्टेशन नाल्यात चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आलं होतं

  • पावसाची नोंद न झाल्याने चुकीचा अहवाल शेतकऱ्यांना मिळाला

  • २ हजारांपेक्षा शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत.

  • या घटनेने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

स्कायमेट वेदर स्टेशनमुळे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या २००० हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अकोट तालुक्यातील उमरा मंडळ अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून पाणी मापक यंत्र अर्थातच स्कायमेट स्कायमेट वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळे ८०० शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. कारण, अतिवृष्टी आणि पावसाचा चुकीचा अहवाल या यंत्रमार्फत गेल्याने आज शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उमरा महसूल मंडळ स्कायमेट कंपनीने 'वेदर स्टेशन' नाल्यात बसवल्याने अतिवृष्टी आणि पावसाची नोंद न झाल्यामुळे या हवामान यंत्राच्या चुकीच्या अहवालामुळे शेतकरी नुकसान भरपाई मदतीपासून वंचित आहेत.

दरम्यान, 17 सप्टेंबरला उमरा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सर्वत्र नुकसान झाले, त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून असलेल्या स्कायमेट वेदर स्टेशनचा चुकीचा अहवाल गेला आहे. हे पाणी मापक यंत्र एका ओढ्याच्या पात्रात स्थित असल्याने यंत्राच्या रिंगेजवरून पाणी वाहत होते. त्यामुळे हे यंत्र पावसाच्या पावसाची नोंद घेण्यात तांत्रिकदृष्ट्या असमर्थ ठरले, असे तपासाअंतिम निष्पन्न झाले.

मात्र या यंत्राच्या चुकीच्या जागेमुळे आणि बिगाडामुळे आज २ हजारांवर शेतकरी शासकीय मदतीपासून दूर राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, आणि यावर तोडगा करत झालेल्या नुकसान भरपाई मदतीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

SCROLL FOR NEXT