Yavatmal Latest Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News: बायको माहेरी जाताच बापाने ३ वर्षांच्या बाळाला विकलं; यवतमाळमधील संतापजनक घटना

Yavatmal Crime News: पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग मनात धरत एका दारुड्या पित्याने आपल्या ३ वर्षाच्या बाळालाच तेलंगणात विकल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावात घडली.

Satish Daud

संजय राठोड, साम टीव्ही | यवतमाळ ६ जानेवारी २०२४

Yavatmal Latest Crime News

पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग मनात धरत एका दारुड्या पित्याने आपल्या ३ वर्षाच्या बाळालाच तेलंगणात विकल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावात घडली. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल करत तेलंगणा येथून ५ जणांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्रावण देवकर, चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या गोडबे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेची फिर्याद पुष्पा देवकर यांनी आर्णी पोलिसांत दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा श्रावण देवकर (वय २७) आर्णी तालुक्यातील (Yavatmal News) कोपरा येथील रहिवासी आहे.

पतीसोबत किरकोळ वाद झाल्याने ३ दिवसांपूर्वी फिर्यादी महिला वर्धा येथे माहेरी निघून गेली होती. गुरुवारी (४ जानेवारी) महिला परत पतीच्या घरी आली. यावेळी तिला आपले बाळ दिसून आले नाही. दिवसभर ती बाळाचा शोधाशोध घेत राहिली.

अखेर रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास आपल्या बाळाला पतीनेच विकले असल्याची माहिती फिर्यादी महिलेला मिळाली. यानंतर संबंधित महिलेने तत्काळ आर्णी पोलिसात (Police) धाव घेत तक्रार दाखल केली. आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.

त्यांनी तत्काळ आपले पथक पाठवून तिच्या पतीला पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने ३ वर्षीय बाळाला तेलंगणात विकल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने तेलंगणा येथील निर्मल गाव गाठून बाळाची सुटका केली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT