Chhatrapati Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना; बापाकडून वर्षभर लेकीवरच अत्याचार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनीच तिच्यावर मागील वर्षभरापासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यातून पीडित मुलगी ही पाच महिन्यांची गर्भवती देखील झाली आहे.

याप्रकरणी पीडित मुलगी घाबरून फिर्याद देत नव्हती. मात्र पीडितेच्या आजोबांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सावत्र बापाच्या अत्याचारामुळे मुलगी पाच महिन्यांची गर्भवती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तपासाला सहकार्य करत नसल्याने आरोपीचे नाव निष्पन्न नव्हते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पीडित मुलीच्या सावत्र बापाला पकडले. गेल्या वर्षभर सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केला. सावत्र बापाने मुलीवर केलेल्या अत्याचारामुळे मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाली होती. दरम्यान, या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा येथील अल्पवयीन मुलीवर गावातीलच अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येची व तिच्या घरच्यांना फसविण्याची धमकी देत इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले.

आरोपी अल्पवयीन मुलाने पीडित मुलीस पाटणादेवीला जायचे आहे, असे सांगून चाळीसगाव शहरातील रामकृष्णनगर मालेगाव रोड येथील महिलांच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kokan Ganeshotsav : गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खड्ड्यातून, मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; कोकणवासीयांसमोर विघ्न कायम

IND VS ENG: पाचव्या टेस्ट सामन्यातून ऋषभ पंत बाहेर; 'या' नवख्या खेळाडूला टीम इंडियात संधी, BCCI ने केलं कन्फर्म

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

SCROLL FOR NEXT