धक्कादायक! चहासाठी बापाचं क्रूर कृत्य; पोटच्या मुलाचा घेतला जीव Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! चहासाठी बापाचं क्रूर कृत्य; पोटच्या मुलाचा घेतला जीव

शाहुवाडी तालुक्यातील आरव केसरे या सहा वर्षीय बालकाच्या खुनाचे रहस्य उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

वृत्तसंस्था

शाहुवाडी तालुक्यातील आरव केसरे या सहा वर्षीय बालकाच्या खुनाचे रहस्य उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच चिमुकल्याचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी त्याच्या शरीरावर गुलाल, हळदी, कुंकु टाकल्याने नरबळीचा संशय घेतला जात होता पण पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

राकेश रंगराव केसरे हा एका हॉटेलमध्ये नोकरी करतो. रविवारी संध्याकाळी हॉटेलवर कामाला जाण्याआधी आरोपीला चहा पिण्याची तलप लागली होती. त्यामुळे आरोपीनं आपला मुलगा आरवला घराबाहेर गेलेल्या पत्नीला बोलावून आण असा निरोप दिला. पण आरवने वडिलांचं काम ऐकण्यास नकार दिला.

मृतदेह लपवून बाप कामाला गेला.

मुलानं काम करण्यास नकार दिल्यानं आरोपी वडीलांना राग अनावर झाला, आणि रागाच्या भरात त्यांनी आरवला भिंतीवर जोरात आपटलं. यावरही राग शांत झाला नाही तर आरोपीने आपल्या मुलाच्या छातीस जोरदार लाथा बुक्या मारल्या. हा मार इतका भयंकर होता, की यामध्ये चिमुकल्याच्या छातीच्या दोन बरगड्या तुटल्या अन् तो जागीच बेशुद्ध झाला. यानंतर आरोपीनं येवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मुलाचा गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर घरामागील पडक्या रुममध्ये मृतदेह लपवून ठेवला.

हळद कुंकू टाकून नरबळी असल्याचे भासवले.

नंतर आपण केलेल्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून आरोपी बापाने आरव बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली. फिर्याद दाखल करुन राकेश शांतपणे सरूड येथील हॉटेलवर कामासाठी गेला. दरम्यान आरवचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. आरोपी बापाने आरवच्या मृतदेहावर हळद कुंकू टाकून घडलेला प्रकार नरबळीचा असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. पण याप्रकरणी पोलिसांनी गावातील आरोपीचे नातलग आणि अन्य स्थानिक नागरिकांशी चौकशी केली असता आरवची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT