Nandurbar accident Saam tv
महाराष्ट्र

शेवटची इच्छा अपूर्णच राहिली; भरधाव वाहनाने चिरडून वडिलांचा मृत्यू,भीषण अपघातामुळे बापलेकींची ताटातूट

Nandurbar accident : नंदूरबारमध्ये भरधाव वाहनाने चिरडल्याने वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या अपघाती मृत्यूने तीन मुलींच्या आधार हरपला आहे.

Vishal Gangurde

नंदूरबारमध्ये भीषण अपघाताची घटना घडली

३७ वर्षीय मनेष गावीत यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला

मुलींना भेटण्यासाठी जात असताना अपघातात मनेष यांचा मृत्यू झाला

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदूरबारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मुलींना खाऊ देण्यासाठी निघालेल्या वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. भीषण अपघाताने बापलेकी तातातूट झाली आहे. वडिलांच्या अकाली मृत्यूने नंदूरबारमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नंदूरबारच्या सुरत-धुळे महामार्गावर बंधारपाड्याचा घरातील कर्ता पुरुष अपघातात जागीच ठार झाला. पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा जागीत अंत झाला. ३७ वर्षीय मनेष गावीत असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.

नेमकं काय घडलं?

नंदूरबारच्या पानबारा येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या तीन मुलींना भेटण्यासाठी जोडपे निघाले होते. मुलींना खाऊ देण्यासाठी निघालेल्या दुचाकीवरील वडिलांना सरपणी नदी पुलाजवळ भरधाव वाहनाने उडवले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला. या प्रकरणी विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतकरी आणि रिक्षाचालक असलेल्या मनेष यांच्या निधनाने कुटुंबाचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे तीन मुलींच्या डोक्यावरचं छत्र हरपलं असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साताऱ्यात सालपे घाटात ट्रकला भीषण आग

सातारा लोणंद मार्गावरील सालपे घाटात ट्रकला भीषण आग लागली. यामुळे तब्बल एक तास वाहतूक कोंडी बघायला मिळाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी केसीपीएल कंपनीचा ट्रक या दुर्घटनेत जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि शरयू साखर कारखान्याचा अग्निशामक बंब दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला विचित्र अपघात

Pune Crime: बायकोच्या छळाला कंटाळला, इमारातीवरून उडी मारत नवऱ्याची आत्महत्या; पुण्यात खळबळ

Wednesday Horoscope: कोणाची होणार प्रगती, कोणासाठी सावधगिरीचा इशारा? जाणून घेण्यासाठी वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय; सुनेत्रा पवारांकडून CBI चौकशीची मागणी

Lapwing Bird: टिटवी पक्षी मृत्यूची चाहूल देतो? अंधश्रद्धा की वैज्ञानिक कारण? उत्तर वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT