Father Dies of Heart Attack at Daughter Wedding  Saam Tv News
महाराष्ट्र

Bhandara News : नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन लेकीचं लग्न, कन्यादानानंतर वडिलांना हार्ट ॲटॅक; आनंदी घरावर दु:खाचं सावट

Father Dies of Heart Attack at Daughter Wedding : दुपारी कन्यादान केल्यानंतर पाहुण्यांची वर्दळ सुरू असतानाच स्टेजवरच वधू पित्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मुलीच्या विवाह मंडपातच ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

Prashant Patil

भंडारा : मुलीच्या डोक्यावर अक्षदा टाकल्यानंतर स्टेजवरच वधु पित्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील झारली गावात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. गणेश खरवडे (वय ५४) अस मृतक वधु पित्याचं नाव आहे. मृतक गणेश वरखडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे एक एकर शेती आहे.

नातेवाईकांकडून काही पैसे घेऊन त्यांनी मुलगी पल्लवीचा विवाह थाटामाटात केला. दुपारी कन्यादान केल्यानंतर पाहुण्यांची वर्दळ सुरू असतानाच स्टेजवरच वधू पित्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मुलीच्या विवाह मंडपातच ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या लग्नातच पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं आनंदाचं क्षणार्धात दुःखात परिवर्तन झालं. वडिलांच्या अशा मृत्यूमुळे मुलीची विदाई थांबली असून संपूर्ण परिवारासह गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, यवतमाळमध्येही अशीच एक हृदयद्रावक घटना काल घडली. मुलगी आयएएस (IAS) झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचे हृदयद्रावक निधन झाल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे घडली. लेक कलेक्टर झाल्याच्या आनंदोत्सवावर दुःखाचं सावट पसरलं आहे. प्रल्हाद खंदारे असं मृत्यू झालेल्या बापाचं नाव आहे. खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.

प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकरी म्हणून निवड झाली. मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून साजरा केला जात असताना प्रल्हाद खंदारे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे मुलीच्या आयएएस अधिकारी पदी झालेल्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या खंदारे परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT