Pandharpur News Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur News: मुलाच्या हळदीत नाचताना बापाचा मृत्यू; पंढरपुरमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना

Video: दरम्यान काल रात्री डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती. नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वधू पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले.

Ruchika Jadhav

Pandharpur:

पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलाच्या लग्नाच्या वरातीत बापाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. सुभाष देवमारे असे मयत पित्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळदीच्या लग्नमंडपात शोककळा पसरली. तसेच संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज दुपारी लग्न सोहळा आयोजित केला होता. दरम्यान काल रात्री डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती. नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वधू पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले.

त्यांना तातडीने येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान देवमारे यांचा मृत्यू झाला. डॉल्बिच्या कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने वराने टाहो फोडला. लग्नाघरातील आनंद अचानक दु:खाच्या छायेत बुडून गेला.

सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. लग्नाच्या वरातीमध्ये सर्रासपणे डॉल्बीचा वापर केला जात आहे. डॉल्बीच्या दणदणाटामुळे यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु कर्कश आवाज सोडून दणदणाट करणाऱ्या डॉल्बिवर मात्र पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत. नियमापेक्षा जास्त डेसिबल आवाज सोडणाऱ्या डॉल्बीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ek Deewane Ki Deewaniyat OTT : हर्षवर्धन राणेचा म्युझिकल रोमँटिक ड्रामा ओटीटीवर कधी येणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: पीएसआय गोपाळ बदनेच शेवटचं लोकेशन सापडलं

Vande Bharat Express : पुण्याहून धावणार आणखी एक वंदे भारत, ५५० किमीचा प्रवास फक्त ७ तासात, वाचा कोणकोणते थांबे असतील?

धावत्या ट्रेनमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; क्षणात सर्वत्र आगच आग, रात्री नेमकं काय घडलं?

Beauty Tips : घामामुळे मेकअप बिघडतो? फक्त 'या' टिप्स करा फॉलो, नेहमी दिसाल ब्युटिफूल

SCROLL FOR NEXT