Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : बुलढाण्यात भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत बापलेकाचा मृत्यू, तीन जण जखमी

Buldhana Accident Death News : बुलढाण्यात भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी आहेत. ट्रकचालक फरार असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Alisha Khedekar

बुलढाण्यात ट्रक-दुचाकी अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू

पत्नी व दोन लहान मुले गंभीर जखमी; उपचार सुरू

ट्रकचालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार

पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला

बुलढाण्यात भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडील आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरुन पळ काढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील कवडगाव येथील गणेश जाधव हे आपल्या मोटार सायकलने हिरो पिंपळगावराजा येथून आपल्या घरी कवडगाव येथे जात होते. .त्यांच्यासोबत मोटार सायकलवर त्यांची पत्नी सपना गणेश जाधव (30) आर्यन गणेश जाधव (10), अरुण गणेश जाधव(4), रुद्र गणेश जाधव ( सात महिने) हे बसले होते. जाधव कुटुंब दुचाकीवरून भालेगाव बाजार मार्गे त्यांच्या घरी जात होते.

यादरम्यान कांदा व्यापारी रजा भाई यांच्या मळ्याजवळ एका भरधाव ट्रकने जाधव यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश यांच्या पत्नी आणि ३ मुलं गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यादरम्यान गणेश यांचा १० वर्षांच्या मुलाचा आर्यनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातामध्ये जखमी झालेल्या सपना जाधव, अरुण जाधव व रुद्र जाधव यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन बळीराम रतन चव्हाण यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध कलम 106 (1), 281, 342 (4) 125 क , 125 ख बी एस एन 2023 तसेच मोटार वाहन अधिनियमाचे कलम 184 134(अ), 187 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, तर आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

SCROLL FOR NEXT