Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Shocking : हृदयद्रावक! कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागला; बापलेकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Electric Shock Tragedy : जळगावातील अक्सा नगर येथे कपडे वाळत घालताना उच्चदाब वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • छतावर कपडे वाळवताना विजेच्या धक्क्याने बाप-लेकीचा मृत्यू

  • मुलीला वाचावण्याचा वडिलांचा प्रयत्न ठरला अपयशी

  • एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • उच्चदाब वीज तारांची असुरक्षितता पुन्हा समोर

जळगावमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विजेचा धक्का लागून बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. घराच्या छतावर कपडे वाळत घालत असताना उच्च दाबाच्या वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने ही घटना घडली. मृतांमध्ये मुस्लिम धर्मगुरू शब्बीर खान आणि त्यांची मुलगी आलिया खान अशी नावे समोर आली असून जखमी तरुणीवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना जळगाव शहरातील अक्सा नगर येथे घडली आहे. मृत आलिया ही घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती. कपडे वाळत घालत असताना तिला बाजूला असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारेला तिचा हात लागला.

विजेचा शॉक लागल्याने ती जागीच चिकटली. आलियाला विजेच्या खांबाला चिकटलेलं पाहून तिच्या वडिलांनी धाव घेतली.आलियाला सोडवण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील विजेचा शॉक लागला. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर या दोघांना सोडवायला गेलेली शब्बीर खान यांची भाची मारिया खान ही गंभीर जखमी झाली.

दरम्यान मारिया हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर खान कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गावकऱ्यांनी देखील हळ हळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्याला फटकारलं; भर मिटिंगमध्येच उपायुक्तांना आला हृदयविकाराचा झटका

Maharashtra News Live Update : परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹२००० मिळणार; मुंबई महापालिकेने आखला मास्टर प्लान

Home Workout की Gym, वजन कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन आहे सर्वात बेस्ट?

MLC Election: राज्यात पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स', महायुतीचे शेकडो नगरसेवक ठाण्यात; राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT