bailgada sharyat
bailgada sharyat saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: रत्नागिरीत बैलगाडा शर्यतीला गालबोट, बैलाच्या धडकेत चिमुकल्यासह वडील गंभीर जखमी

अमोल कलये

Ratnagiri Bailgada Sharyat: रत्नागिरीच्या चिपळूनमध्ये बैलगाडा शर्यतीला (Bailgada Sharyat) गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. या स्पर्धेदरम्यान बैलाच्या धडकेत (collision with bull) एका चिमुकल्यासह वडील गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या चिमुकल्यासह वडिलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूनच्या कळमुंडी येथे रविवारी 14 तारखेला बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत पार पडल्यानंतर जिंकलेल्या बैलासोबत फोटो काढायला जाणं पिता-पुत्रांना चांगलेच महागात पडलं. फोटो काढत असताना अचानक बैलाने या पिता-पुत्रांना शिंग मारले. बैलाच्या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.

बैलाने शिंग मारल्यामुळे चिमुकल्याचा जबडा आणि कान फाटला. जखमी मुलावर कराडमधील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. तर त्याच्या वडिलांवर देखील उपचार सुरु आहेत. जखमी झालेले पिता-पुत्र हे चिपळूनच्या कोंढे गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने गुरुवारी बैलगाडा शर्यतीबाबत मोठा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. कोर्टाने महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीसंदर्भात तयार केलेला कायदा वैध असल्याचे ठरवत या शर्यतीला परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत सगळ्यांकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज भरलाय , माघार घेणार नाही; वैशाली दरेकर यांचा निर्धार

Google Audio Emoji: फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MI vs KKR, Toss Prediction: टॉस ठरेल बॉस! KKR ला हरवण्यासाठी मुंबईने आधी काय करावं?

SCROLL FOR NEXT