Wreckage of the auto rickshaw after a tragic accident near Kasar Malai, Raigad. saam tv
महाराष्ट्र

Rickshaw Accident: रायगडमधील कासार मलईजवळ रिक्षाला मोठा अपघात, चालकासह तिघांचा मृत्यू

Raigad road accident : श्रीवर्धन-गोरेगाव रस्त्यावर कासार मलाईजवळ भीषण अपघात झालाय. ऑटो रिक्षाचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

  • कासार मलईजवळ रिक्षाला मोठा अपघात झाला.

  • या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एका महिलेचा समावेश आहे.

  • रिक्षाचालक संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला.

सचिन कदम, साम प्रतिनिधी

श्रीवर्धन ते गोरेगाव मार्गावर कासार मलईजवळ रिक्षेला मोठा अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. संतोष सावंत (रिक्षाचालक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शांताराम धोकटे आणि शर्मिला धोकटे यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई–गोवा महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात खासगी बसचा भीषण अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात आज पहाटे साधारण ४:१५ वाजण्याच्या सुमारास खासगी बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलंय.

बस थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या एका विद्युत पोलवर जाऊन आदळली. या जोरदार धडकेत विद्युत पोल कोसळला. या भीषण अपघातात बसचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक दुकानाचेही नुकसान झाले आहेत. तसेच अपघाताची वेळ पहाटेची असल्याने बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती. तसेच रस्त्यावरील वाहतूक कमी असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परतीच्या प्रवासात गणेशभक्तांवर वाहतुक कोंडीच विघ्न

Asia Cup 2025: आमदाराच्या जावयाला आशिया कपसाठी मिळाली संधी, BCCI ने दिली महत्वाची जबाबदारी

Maharashtra Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोठी कारवाई; नगराध्यक्षांसह ६ नगरसेवक निलंबित

Maharashtra Politics: राजकीय खलबतं! राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार; पडद्यामागे काय घडतंय?|VIDEO

Relationship Tips: नातं कसं टिकवायचं? नातेसंबंध मजबूत होण्यासाठी करा 'या' चार गोष्टी

SCROLL FOR NEXT