Eknath Shinde 
महाराष्ट्र

Dharashiv flood crisis : शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं, धाराशिवकर आक्रमक | VIDEO

धाराशिवमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत तात्काळ मदतीची मागणी केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे वातावरण तापले.

Namdeo Kumbhar

Farmers surround Eknath Shinde in Dharashiv demanding immediate flood relief : तात्काळ मदतीची मागणी करत धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना घेरलं. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आले आहेत. शिंदेंसोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंतही उपस्थित होते. आज दुपारी एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये पोहचल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांना घेराव घातला अन् तात्काळ मदत करा, अशी मागणी केली. एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण धाराशिवकरांचा राग मात्र कमी झाला नाही. धाराशिवमध्ये पावसामुळे होत्याचे नव्हते झालेय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भुम,परंडा कळंब तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंञी प्रताप सरनाईक, मंञी प्रकाश आबिटकर हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. एकनाथ शिंदे हे कळंब तालुक्यातील आथर्डी, भूम तालुक्यातील पाथरूड, परंडा तालुक्यातील रुई या गावात पाहणी करणार आहेत. आज दुपारी एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये पोहचल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शिंदे पाहणीसाठी पोहचले होते. पण त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

नुकसानग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात आले आहेत. सरकारी मदतीऐवजी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून वैयक्तिक मदतीवर भर देण्यात आल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांच्या या प्रचारावरुन धाराशिवमधील ग्रामस्थ संतापल्याचे देखील दिसून आले. गेल्या तीन दिवसांपासून कोणीच आले नाही. आम्हाला तुमची मदत नको, तुमचा टेम्पो घेऊन जा...असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. तर काही नागरिकांनी आमचा संसार पाण्याखाली गेलाय, आम्हाला मदत घेऊ द्या...असं पवित्रा घेतलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरच्या औराद शहाजनी भागातील नुकसानीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Face Care Tips: ग्लोइंग अन् हेल्दी स्कीनसाठी आजच बदला 'या' सवयी, अन्यथा त्वचा होईल खराब

Marathi Actress: 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, ते पण नवरात्रीत'; 'बोल्ड' फोटोशूटमुळं मराठी अभिनेत्री ट्रोल

Ramlila: राजा दहशथची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सिंहासनावरच सोडले प्राण; मन सुन्न करणारा VIDEO

आमचं सर्वस्व गेलंय...पुरात १० वर्षांचा मुलगा वाहून गेला, कुटुंबीयांच्या डोळ्यातलं पाणी थांबेना | VIDEO

SCROLL FOR NEXT