Farmers submerged in floodwaters while leaders indulge in lavish celebrations, highlighting shocking insensitivity in Marathwada. Saam Tv
महाराष्ट्र

शेतकरी पाण्यात, सत्ताधारी नाचगाण्यात, शिंदेसेनेच्या नेत्याचा असंवेदनशीलतेचा कळस

Farmers in Crisis, Leaders in Celebration: शेतकरी चिखलात आक्रोश करत असताना सत्ताधारी शिंदेसेनेच्या नेत्याने असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय.. मात्र हिंगोलीत काय घडलं? त्याबरोबरच परभणीतही कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्याच्या जखमेवर कसं मीठ चोळलं जातंय?

Bharat Mohalkar

मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालाय... घर, दार सगळं पाण्यात गेलंय... या शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सत्ताधारी शिंदेसेनेच्या हिंगोलीतील पदाधिकारी राम कदम या असंवेदनशील पदाधिकाऱ्याचा हा कारनामा बघा...

हिंगोलीत अतिवृष्टीने आसणा नदी पात्राबाहेर गेलीय.. शेतकऱ्यांची घरं पाण्यात आहेत..अनेक गावांचा संपर्क तुटलाय..मात्र राम कदम या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याने गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला.. या कार्यक्रमाला थिल्लरपणा करणाऱ्यांनीही मोठी गर्दी केली.. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्जही केला.. मात्र शेतकरी अन्न पाण्याविना हतबल झाला असताना सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी पैशांची उधळपट्टी करत बेभान झालेत...त्याचा थेट उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतलाय...

मुद्दा फक्त हिंगोलीचाच नाही... अशीच पैशाची उधळपट्टी परभणी कृषी विद्यापीठातही पाहायला मिळालीय... ही दृष्य पाहा... ही गाण्याची मैफिल... हा खाण्यापिण्याचा बडेजाव.... आणि मागे दिसणारी विद्युत रोषणाई... ही दृश्य आहेत परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील... खरंतर कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असतात.. मात्र परभणीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरु हेच विसरलेत.. शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलं असताना आणि शेतकरी टाहो फोडताना परभणीच्या कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवादाच्या नावाने उधळपट्टी सुरुय... त्यामुळे उधळपट्टी करणाऱ्या असंवेदनशील कुलगुरुंना पदावरुन हटवण्याची मागणी जोर धरु लागलीय..

मराठवाड्यात 24 तासात 141 मंडळात अतिवृष्टी झालीय. .. शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असताना धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी गाण्यावर ठेका धरतात.. कुठे सत्ताधारी पक्षाचे नेते गौतमी पाटील आणि माधुरी पवारांना नाचवतात... तर कृषि विद्यापीठात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जातंय.. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगात, शेतकरी कोलमडून पडला असतानाही हे नेते, अधिकाऱ्यांमध्ये एवढी असंवेदनशीलता येतेच कुठून....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Stampede: विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? नेत्यांमुळे की पाण्याच्या बाटल्या वाटपामुळे? मुख्य कारण काय

Vijay Thalapathy Rally: बत्ती गूल होताच घडली चेंगराचेंगरी, ३१ जणांचा मृत्यू ; अभिनेत्याच्या सभेत धडकी भरवणारी गर्दी, Video Viral

Voter ID Scam in South Mumbai: मुंबईच्या सोसायटीमध्येही व्होटचोरी? राहणार फुटपाथवर, पत्ता सोसायटीचा

'PM केअर फंडातून कर्जमाफी द्या' शेतकरी कर्जमाफीवरुन ठाकरेंनी घेरलं

Shocking : नणंद देखण्या वहिनीच्या प्रेमात, घर सोडून दोघी पळाल्या; WhatsApp चॅट्समुळे सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT