पीक विमा  
महाराष्ट्र

विमा कंपन्या अशी करतात फसवणूक

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : निसर्गाच्या लहरीपणामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणला आहे. पीक विम्याची रक्कम भरली आणि शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने किंवा दुष्काळाने नुकसान झाले तर त्याला किमान काही रक्कम मिळावी यासाठी भरपाई दिली जाते. मात्र, विमा कंपन्या शेतकऱ्यांना गंडवतात. मोठीच्या मोठी रक्कम विमा हप्त्यापोटी वसूल करतात पण त्यांना भरपाई देत नाहीत. विमा नाकारला तर शेतकरी दाद मागत नाहीत, त्यामुळे या कंपन्यांचे फावते. आणि सरकारच्या आड दडून त्या शेतकऱ्यांची लूट करतात.

शेवगाव तालुक्यातील ४४ हजार २६१ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ५३२ शेतकऱ्यांनाच विमा मंजूर करून पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. तालुक्यातील २१ हजार ७०५ हेक्टर पिकांसाठी संरक्षित केलेल्या रकमेच्या दोन टक्के प्रमाणात एक कोटी ९१ लाख ३४ हजार ११४ रुपयांचा विमा भरला होता. मात्र, पिकांचे नुकसान होऊनही केवळ २२ लाख २९ हजार ३६ रुपयांचा विमा देत कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली.

तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून दर वर्षी विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. अतिवृष्टी, गारपीट अशा अनेक आपत्तींमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे किमान केलेला खर्च तरी मिळावा, या हेतूने शेतकरी पीकविमा भरतात. Farmers refuse crop insurance

बियाणे, खते, मशागत यावर मोठा खर्च करूनही लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या जोखमीचा फायदा आता विमा कंपन्याही मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या वर्षी तालुक्यातील ४४ हजार २६१ शेतकऱ्यांनी २१ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रासाठी एक कोटी ९१ लाख ३४ हजार ११४ रुपयांचा विमा भरला होता. त्यामध्ये कपाशी, तूर, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कांदा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता.

गेल्या वर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरिपासह रब्बी पिकांचेही नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली. मात्र, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. विमा भरलेल्या ४४ हजार २६१ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ५३२ शेतकऱ्यांनाच विमा रक्कम मंजूर करून त्यांची एक प्रकारे फसवणूकच केली. Farmers refuse crop insurance

पीकविम्यासाठी शासनाने नेमलेल्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले आहेत. विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून नफेखोरी करणाऱ्या या कंपन्या नैसर्गिक आपत्तीतही विमा रक्कम देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. या विषयावर शासकीय स्तरावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा करू.

- डॉ. क्षितिज घुले, सभापती, पंचायत समिती, शेवगाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT