Farmer Protest Saam Digital
महाराष्ट्र

Farmer Protest: बुलढाण्यात 20 नोव्हेंबरला धडकणार शेतकऱ्यांचे वादळ, सरकार विरोधात एल्गार

Farmer Protest: बुलढाणा जिल्हातील शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय हक्कासाठी एकवटले आहे. शेतकऱ्यांचे हे वादळ 20 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात धडकणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Farmer Protest

पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन सुरू असताना आता बुलढाणा जिल्हातील शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय हक्कासाठी एकवटले आहे. शेतकऱ्यांचे हे वादळ 20 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात धडकणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य ‘एल्गार महामोर्चा’ जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या महामोर्चासाठी गावगाड्यातील शेतकऱ्यांसह शहरातील नागरिक देखील एकवटले आहेत. त्यामुळे हा महामोर्चा लक्षवेधीच नव्हे तर सरकारला धडकी भरवणारा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीन कापूस - उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. या लढ्याचा पहिला टप्पा म्हणजे ‘एल्गार महामोर्चा’ आहे. या महामोर्चाची गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी रथयात्रेचा दणक्यात श्रीगणेशा केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासह शेतकरी, शेतमजूर, तरुणांची मोठी फौज उभी करत रविकांत तुपकर यांनी गाव-खेडे पिंजून काढले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गावोगावी या रथयात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. स्वतःच्या खर्चाने आणि स्वयंस्फुर्तीने या महामोर्चात सहभागी होण्याचे वचन देत गावोगावी शेतकरी रविकांत तुपकरांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे प्रचंड मोठे वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. बुलढाणा शहरातील जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथून दुपारी १२ वाजता या महामोर्चाची सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य मार्गाने फिरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल त्यानंतर तेथे या मोर्चाला जिल्ह्याभरातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रविकांत तुपकरांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT