मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; पावसाविना पिके धोक्यात! SaamTv
महाराष्ट्र

मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; पावसाविना पिके धोक्यात!

मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने खरीपाची पिकं धोक्‍यात आली आहेत. लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

डॉ. माधव सावरगावे

मराठवाढ्यात पावसाने पुन्हा सगळ्यांची चिंता वाढवली आहे. काही भागात महिनाभरापासून तर काही भागात पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळापासून पावसाने ओढ दिल्याने खरीपाची पिकं धोक्‍यात आली आहेत. लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. दुपारच्या वेळी पिके माना टाकू लागली आहेत. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील पिकं कशीबशी तग धरून आहेत. त्यातच आता सोयाबीन, मका, कापूस या पिकावर किड रोगांचा प्रादूर्भावही वाढला आहे.Farmers in Marathwada waiting for rains; Crops in danger without rain

हे देखील पाहा-

यावेळी सुरुवातीला चांगला पाऊसRain झाला, त्यानंतर पावसाने ओढ दिली, मधल्या काही काळामध्ये पाऊस झाला आणि आता पिकांची वाढ आणि फुलोरा स्थितीत येत असताना पाऊस झाला नाही. सध्या मराठवाड्यातMarathwada सरासरीच्या तुलनेत केवळ ६९ टक्के इतकाच पाऊस झाला. दुसरीकडे मराठवाड्यातील धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नाही. सुरुवातीच्या पावसामुळे नांदेड,Nanded परभणी,Parbhani हिंगोलीHingoli या जिल्ह्यातील प्रकल्पात पाणी आले. मात्र, उर्वरित मराठवाड्यात प्रकल्पातील साठा वाढला नाही.

मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत ६९ टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यामध्ये काही जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत चालली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस झाला आहे त्याची सरासरी औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षीच्या सरासरीच्या तुलनेत ५९.२,बीड ६९.९, जालना ७९.५, हिंगोली ७०.७, उस्मानाबाद ५७.१, लातूर ६१.८ , परभणी ७६.२ आणि नांदेड ७६.१ टक्के इतका पाऊस झालाय. आता पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटून चालले तरी यात वाढ होत नसल्याने चिंता वाढू लागली आहे. दरम्सान सध्या जायकवाडी धरणात ४०.९४ टक्के पाणीसाठा आहे तर मांजरा २२.३६, माजलगाव ३१.९९, निम्न तेरणा ५५.४९, सिना कोळेगाव उणे ३.६०,विष्णुपुरी ७४.९७, पैनगंगा ६८.५१ टक्के, येलदरी ७४.२५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात पिकासाठी आणि प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यासाठी पावसाची गरज आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT