जालना: 'शेतकऱ्यांच्या उसाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी'  Saam TV
महाराष्ट्र

जालना: 'शेतकऱ्यांच्या उसाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी'

महावितरणच्या गलथान कारभारामुळे हा संपूर्ण ऊस जाळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालं आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: शाॅर्टसर्किटमुळं तब्बल 44 हेक्टर 38 आर शेतजमिनीवर लागवड केलेला ऊस जळुन खाक झालंय, महावितरणच्या गलथान कारभारामुळे हा संपूर्ण ऊस जाळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच या 58 शेकऱ्यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. या ठिकाणी नेहमी होत असलेल्या शाॅर्टसर्किटमुळे आग लागण्याचे प्रकार सतत होत असल्या बाबद माहिती ही दिली होती, मात्र महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने न घेतल्यामुळे शेकऱ्याच्या मोठे नुकसान झाले असून यास महावितरण विभागाच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यानी केला आहे.

आज भाजपा आमदार संतोष दानवे यांनी शेकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ,जळालेल्या ऊसाच्या शेताची पाहणी केलीय आणि शेतकऱ्यांना धीर देत आहेत. महावितरण विभागाच्या या गलथान कारभाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन नुकसान ग्रस्त शेकऱ्यांना देत महावितरण विभागाने तात्काळ नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या जळालेल्या उसाचे पंचनामे करून शेकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महावितरण विभागाच्या अधिकारी आणि ऊर्जा मंत्राकडे करत, या पुढील काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु असे आश्वासन आमदार संतोष पाटील दानवे यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT