Fertilizer (File Photo)
Fertilizer (File Photo) Saam tv
महाराष्ट्र

Sangli Farmers News: शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी सांगावी लागतेय जात; सांगलीतील प्रकारामुळे शेतकरी संतप्त

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangli News: अनुदानित रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागत असल्याची धक्कादायक प्रकार सांगलीत समोर आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा दुकानदारांबरोबर वादाचे प्रसंग घडत आहेत.

रासायनिक खतांसाठी शासन खत कंपन्यांना अनुदान देते. अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशीन यंत्रणा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना दुकानात खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशीनवर शेतकऱ्यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. (Latest News)

दरम्यान गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशीनचं सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेट्स आले आहेत. यानुसार शेतकऱ्यांची वर्गवारी करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे. यावरुन शेतकरी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पैसे घ्या आणि खत द्या आमची जात शेतकरी आहे, अशी उत्तरं शेतकरी दुकानदारांना देत आहेत. मात्र माहिती भरल्याशिवाय खत देता येणार नाही, जात सांगा अशी भूमिका दुकानदार घेत आहे. यातून अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT