talathi office  
महाराष्ट्र

तलाठी वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयास ठाेकले टाळे

अभिजीत घोरमारे

भंडारा : ऐन शेतीच्या हंगाम सुरु असताना तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांचे पीक पेरा भरून सात बारा मिळत नाही या कारणास्तव छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेच्या मार्फत शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत चक्क तलाठी कार्यालयाला talathi office कुलूप लावल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गुरढा येथे घडली आहे. या आंदाेलनात शेकडो शेतकरी उपस्थित होते. farmers-gurda-talathi-office-bhandara-marathi-news

धान खरेदी केंद्रावर नोंदणीची घाई सुरु झाली असून खरीप हंगामातील शेतकरी नोंदणीची मुदत ही सप्टेंबर अखेरपर्यंत आहे. त्यामुळे शेतकरी आपली नोंदणी व्हावी या उद्देशाने ई पीक पाहणी वर माहिती भरून कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. परंतु संबंधित तलाठ्यांनी सात बारा देण्यासाठी आजची (ता. 20) तारीख दिली होती. त्यामुळे शेकडो शेतकरी हे कार्यालयात हजार झाले होते. येथे तलाठीच वेळेवर न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सझा क्रमांक 18 तलाठी कार्यालयाला कुलूप लावून टाकले. कामात हलगर्जीपणा करणारे तलाठी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर मोहतूरे यांनी केली.

यावेळी एकच गोंधळ उडाला होता. अखेर पालांदुर येथील मंडल अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढत लवकर सातबारा देण्याचे आश्वसन मिळाल्यावर जमाव शांत झाला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. हे आंदाेलन

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक, वंचित बहुजन आघाडीची आज महत्वाची बैठक

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT