sangli, farmers protest saam tv
महाराष्ट्र

Sangli News : 'रेल्वे' च्या विराेधात वसगडेतील शेतकऱ्यांचे ठिय्या आंदाेलन

बागायत जमिनीच्या मुल्यांकनानुसार ५ पट मोबदला देण्यात यावा अशी शेतक-यांची मागणी आहे.

विजय पाटील

Sangli News : पुणे-मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी (pune miraj londa doubling project) जमीन दिलेल्या शेतक-यांना अद्याप संपादनाचा माेबदला मिळालेला नाही. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत आज (शुक्रवार) ठिय्या आंदोलन छेडले आहे. (Maharashtra News)

पुणे-मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसगडे मधील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेने संपादित केल्या आहेत. मात्र मागील दोन महिन्यापासून या दिलेल्या जमिनीचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना रेल्वेकडून मिळाला नाही.

जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाशी सातत्याने संपर्क साधून देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. दुसरीकडे आता पावसाळा १० ते १५ दिवसावर येवून ठेपला आहे. मान्सूनचा पाऊस जर चालू झाला तर शेतीस ये जा करण्यास रस्ता सुद्धा उपलब्ध नसलेने शेती पिकांचे प्रचंड नुकसान हाेणार आहे. यापूर्वी देखील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत आज ठिय्या आंदोलन छेडले आहे.

साम टीव्हीशी बाेलताना आंदाेलक म्हणाले पुणे-मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पास प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही. त्यामुळे भुसंपादन कायदयातील थेट खाजगी वाटाघाटीच्या तरतुदीनुसार बागायत जमिनीच्या मुल्यांकनानुसार ५ पट मोबदला देण्यात यावा अशी आमची मागणी आहे.

सध्या वहिवाटीत व शेत जमीन कसत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे भूसंपादनाचे दस्त करून मिळावेत अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

जरांगेंची मंत्री विखे पाटलांकडे खळबळजनक मागणी, परळीवाल्या आता...; काय घडलं? VIDEO

Maharashtra News Live Update: रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्याचे उभे केळीचे पीक जमीन दोस्त

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

SCROLL FOR NEXT