अमरावती : जिल्ह्यातील चांदूर बाजार,अचलपूर, मोर्शी, वरुड या तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या संत्रा गळतीने डबघाईस आलाय. गेल्या सहा ते सात वर्षांपासून या परिसरात ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात संत्रा फळांना गळती लागते. त्यामुळे राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्राने (एनआरसी) शेतकऱ्यांना अनुदान न देता संत्रा फळ गळतीवर संशोधन करून बागा वाचवाव्यात, अशी फळबाग शेतकऱ्यांची भावना आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी, वरुड या तालुक्यातील अनेक गावांमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी हे शेतकरी मृग आणि आंबिया बहराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. मात्र, गेल्या सहा ते सात वर्षांपासून या भागातील संत्रा झाडांना मोठ्या प्रमाणात फळगळती लागली आहे. मात्र, संशोधन केंद्राद्वारे आजपर्यंत फळगळतीबाबत कुठल्याही प्रकारचे संशोधन करण्यात आले नाही. Farmers demand research on orange fruit
सन २०१८-१९ मध्ये चांदूर बाजार येथील फळगळती बाबत एक कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यावेळी संशोधन केंद्रातील संशोधकांनी संत्रा गळतीवर संशोधन करून नवीन शिफारसी देण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र, अजूनपर्यंत या शास्त्रज्ञांनी फळगळतीवर कोणतेही संशोधन केले नाही. या भागात ते त्यासाठी फिरकलेही नाहीत. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होते.
नागपूर येथील संशोधन केंद्रावर केंद्र सरकारकडून दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे नवीन संशोधन या संशोधकांनी केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संशोधकांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यावर लवकर तोडगा न काढल्यास शेतकऱ्यांकडून गळलेले संत्रा फळ फेको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी दिला. आज हे सर्व शेतकरी नागपूर एनआरसी येथे धडकणार आहेत.
राज्य व केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे संशोधन करीत असल्याचे वेळोवेळी जाहीर करते. मात्र, संत्रासारख्या फळपिकावर आजपर्यंत कोणत्याच प्रकारचे संशोधन झाले नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.Farmers demand research on orange fruit
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.