महाराष्ट्र

Buldhana News : झोपडीला आग लागून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; आगीतून सुटकेचा प्रयत्न केला, पण लोखंडी पाईपमुळे घात झाला

गणेश नारखेडे असं 34 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

संजय जाधव

बुलडाणा : शेतातील झोपडीत झोपलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे झोपडीला आग लागली होती. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमधील दुधलगाव येथे ही घटना घडली. गणेश नारखेडे असं 34 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील शेतकरी गणेश नारखेडे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात झोपले होते. रात्रीच्या सुमारास अचानकपणे मोटरच्या शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या झोपडीला आग लागली. शेतकऱ्याने या आगीतून सुटका करून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला.

मात्र शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण झोपडीत करंट पसरला होता. धावपळीत हात लोखंडी पाईपला लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेतामध्ये कुणीच नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. त्यामुळे करंट लागून पडलेल्या गणेश यांचा होरपळून मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT