bendur, satara, jawali, farmers
bendur, satara, jawali, farmers saam tv
महाराष्ट्र

Bendur : तापोळा,फुरूस, हातरेवाडी, मांटी, आपटीत शेतक-यांनी वाजत गाजत काढली बैलांची मिरवणुक

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यातील (satara) जावली (jawali) तालुक्यातील तापोळा विभागात बारशीच्या दिवशी बेंदूर (bendur) सण साजरा करण्याची प्रथा आहे. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बारशीच्या दिवशी बेंदूर सण साजरा करण्यात येतो. ही परंपरा पूर्वीपासून सुरू असल्याचे येथील शेतकरी (farmers) सांगतात. (bendur festival latest marathi news)

एकादशीनंतर (ashadhi ekadashi) दरवर्षीप्रमाणे बारशीला बेंदुर साजरा करत असताना गावातील प्रत्येक घरातील बैलजोड्या यावेळी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. तापोळा ,फुरूस, हातरेवाडी , मांटी, आपटी येथे हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बैलांना रंगवण्यात आले होते. त्यांची सकाळी पूजा करून गावातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणुक गावाच्या मंदिरापासून सुरु झाली. या मिरवणुकीत ज्येष्ठांसह चिमुकले देखील सहभागी झाले हाेते. या मिरवणुकीनंतर बैलांना गाेड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर शेतकरी वर्गाने देखील एकमेकांच्या बैलांचे पूजन केले. बेंदर सण आमच्यासाठी खूप महत्वाचा असताे. वर्षभर आमच्यासाठी राबणारी बैल ही देवा समान असल्याचे काही शेतक-यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: भाजपने ४०० जागा जिंकल्यास POK ताब्यात घेऊ; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Kalyan Crime : झटपट पैसे कमावण्याच्या नादात मूर्तीकार बनला चोर; लोकलमध्ये चोरी करताना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Rajasthan News: १३ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन, खाणीत अडकलेल्या १४ अधिकाऱ्यांची सुटका; एकाचा मृत्यू

Today's Marathi News Live : मुंबईमध्ये राज ठाकरेंचा रोड शो होणार?

EPFO Auto Claim : EPFOचा नागरिकांना मोठा दिलासा; घर, लग्न, आजारपणासाठी करता येणार ऑटो क्लेम

SCROLL FOR NEXT